Satish Bhosale Saam tv
महाराष्ट्र

Beed: पाठीवर निळे वळ, खोक्याचं डोकं बर्फाच्या पाण्यात बुडवलं..कोठडी नसतानाही मारहाण; वकिलांचा आरोप

Khokya Bhosle Case: वनविभागाच्या ताब्यात असलेल्या खोक्या भोसलेला कोठडी नसतानाही अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केला आहे.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले हे प्रकरण तापलं आहे. खोक्या भोसले सध्या वन विभागाच्याच्या ताब्यात आहे. दरम्यान, खोक्याला बेदम मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोठडी नसतानाही अमानुष मारहाण झाल्याचा गंभीर आरोप भोसलेचे वकील अँड. सावंत यांनी केला आहे. विशेष म्हणजे, मारहाणीनंतर खोक्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, मारहाण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मारहाणीनंतर डोके पाण्यात बुडवले

खोक्या भोसलेच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सतीश भोसलेला मारहाण केली. नंतर खोक्याच्या डोक्यावर बर्फाचे पाणी ओतले आहे. तसेच मारहाण करत असताना अधिकाऱ्यांनी त्याला काही जणांचे नावे घेण्याची बळजबरी देखील केली. असा खळबळजनक आरोप अँड सावंत यांनी केले आहेत. या प्रकरणानंतर खोक्याचे जखमी अवस्थेतील फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मारहाण प्रकरणाची माहिती न्यायालयापर्यंत पोहोचल्यावर, खोक्या भोसलेच्या वकिलांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधाक गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे अँड. सावंत यांनी सांगितले आहे.

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मारहाणीनंतर खोक्या भोसलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत खोक्या भोसलेला शारीरिक इजा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर न्यायालयाने खोक्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT