Nandurbar Crime News, dhadgaon, women molested Saam TV
महाराष्ट्र

Khed Crime News: धक्कादायक! आई आणि बहिणीचा क्रूरतेने छळ करत होता; डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या

अशात खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाती निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रोहिदास गाडगे

Khed News: नाती फार अनमोल असतात. वाईट शब्दांनी आई, वडील आणि भावंडांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. व्यक्तीच्या मनात राग भरतो आणि रागाच्या भरात मोठ मोठे गुन्हे घडतात. अशात खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खेड (Khed) तालुक्यातील चांडोली येथे बहिणीची छेड काढतो, आईला अश्लील भाषेत बोलतो, या कारणावरून एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, मृतदेह पाच दिवस बंद खोलीतच राहिल्याने ओळखही पटणं अशक्य झालं.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल अशोक इंगुले (वय २२, रा. मोशी, ता. हवेली) असं मृत तरुणाचं नाव आहे. आठ दिवसांपूर्वी चांडोली येथील फळ उत्पादन रोपवाटिकेत त्याचा खून झाला होता. गुन्ह्याच्या तपासात कोणताही पुरावा हाती नसल्यामुळे अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड (Stone) घालून खून केला असल्याचे पोलिसांना आढळून आले होते.

घटनास्थळी पोहचत पोलिसांनी बारकाईने पाहणी केली परंतु, हत्या केलेल्या गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी कोणताही पुरावा त्या ठिकाणी मिळाला नाही. त्यामुळे हत्या झालेल्या तरुणा त्याच्या वारसांचा आणि आरोपींचा शोध घेणे कठीण होते. अखेर राजगुरुनगर पोलीसांनी पाच आरोपींना अटक केलीय यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT