kharashi villagers andolan for teacher bhandara news saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : २५ दिवसांपासून शिक्षकांविना शाळा सुरु, अखेर खराशी ग्रामस्थांनी शाळेला ठोकलं टाळं

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News :

भंडारा जिल्ह्यातील खराशी येथील शिक्षक नियमानुसार मिळाले नसल्याने गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर गावक-यांनी शाळेसमाेर ठिय्या आंदोलन केले. शिक्षण विभागाने तातडीने शिक्षकाची व्यवस्था करावी अन्यथा आगामी काळात तीव्र आंदाेलन छेडणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (Maharashtra News)

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने खराशी येथील शाळेस शिक्षकाची नेमणुक केली. परंतु गत २५ दिवसांपासून शाळेत दोन शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ लागले आहे. यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत.

याबाबत अधिक माहिती अशी : नियमानुसार शाळेतील पदवीधर शिक्षक चिंधालोरे यांची पदोन्नती व बदली करण्यात आली. त्याच नियमाने पुन्हा त्यांना मूळ जागी परत करण्याचा शब्द शिक्षण विभागाने पाळला नसल्याने समस्या कायम आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासनाने शिक्षक भरती वेळेत न केल्याने शिक्षकांची कमतरता भेडसावत आहे. तर जि.प.शिक्षण विभागाने खराशी येथील शाळेस शिक्षक दिले आहेत. मात्र बदली झालेल्या शिक्षकांची पुन्हा खराशी शाळेला द्या या मागणीसाठी गावकऱ्यांनी शाळेला कुलुप ठोकले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT