MONSOON LIKELY TO ENTER KERALA WITHIN HOURS; YELLOW ALERT ISSUED FOR MUMBAI, KONKAN AND SEVERAL MAHARASHTRA DISTRICTS Saam Tv
महाराष्ट्र

Monsoon Update : पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सून धडकणार, राज्यात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा अंदाज

Maharashtra Weather Update Today : केरळमध्ये पुढील काही तासांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • केरळमध्ये पुढील काही तासांत मॉन्सून दाखल होणार

  • कोकणासह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता

  • राज्यातील बहुतांश भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

  • नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Monsoon Update Today 4th June राज्यात उकाड्याने नागरिक हैराण झालेले असताना दुसरीकडे आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सूनची प्रतिक्षा संपली असून पुढच्या काही तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD च्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबई, कोकण, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई (Mumbai Rain Alert), रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण (Kokan Rainfall Alert) किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानासह दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिकच्या (Nashik Weather ) घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, तसेच काही भागांत वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, काही ठिकाणी वादळी वारे वाहू शकतात. घाटमाथा परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, विदर्भात (Vidarbha Heatwave ) उन्हाचा चटका कायम आहे. काल अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविण्यात आले. विशेषतः वर्धा जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दुसरीकडे, मॉन्सूनची प्रगतीही वेगाने सुरू आहे. शनिवारी मॉन्सूनने लक्षद्वीप बेटे, अरबी समुद्राचा काही भाग, कोमोरिन क्षेत्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भाग व्यापला होता. सध्या केरळ, तमिळनाडूच्या काही भागांसह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील आणखी काही क्षेत्रांमध्ये मॉन्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मॉन्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hospital Fire : हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव! ICU वॉर्डात भयंकर आग, १० रुग्णांचा मृत्यू, अनेक जण गंभीर

Shirdi: कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट; ६० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Politics : भाजपला जबरी धक्का, डोंबिवलीतील ४ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

अजब अटींमुळे नाफेडची कांदा खरेदी रखडणार? राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT