beed crime news, youth, arrests, kej police Saam Tv
महाराष्ट्र

Pune Koyta Gang : वकीलाने आरडाओरडा करताच केज पाेलिसांची काेयता गॅंगवर झडप, झटापटीनंतर तिघे अटकेत

नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

विनोद जिरे

Beed Crime News : पुणे शहर आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या तिघांना बीडच्या केज तालुक्यात एका वकिलावर हल्ला करताना जेरबंद करण्यात पाेलिसांना यश आले आहे. ही कारवाई बीडच्या केज पोलिसांनी केली आहे. (Maharashtra News)

केज महामार्गावरील जोला शिवारात एका पेट्रोल पंपासमोरून वकील प्रदीप इतापे व त्यांचे मित्र एकनाथ काळे हे दुचाकीवरून केजकडे जात होते. यावेळी दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या 3 अनोळखी तरुणांनी (youth) त्यांना रस्ता विचारण्याच्या बहाण्याने अडविले. त्यानंतर दुचाकीची चावी काढून घेतली. तसेच, त्यांचे मोबाइलही घेतले व पैशांची मागणी करून त्यांच्यावर कोयते उगारून धाक दाखविला.

अँड. इतापे व काळे यांनी आरडाओरड केली असता जवळच खासगी कामासाठी गेलेले पोलिस कर्मचाऱ्याने हा प्रकार पहिला. त्यांनी तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात झटापट झाली. घटनास्थळावरील इतर नागरिकांच्या मदतीने वकीलांची सुटका करत पाेलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं. दरम्यान केज पोलिसांनी पुणे पोलिसांना याविषयीची माहिती दिली असता हीच ती कोयता गॅंग असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT