accident news 
महाराष्ट्र

भरधाव ट्रॅक्टरची ३ वाहनांना धडक; चाकाखाली चिरडून महिला ठार

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील कवठेपिरान नजीक भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले. या अपघातात स्वाती स्वप्नील माळी ही महिला जागीच ठार झाली. त्यांचे पती स्वप्नील हे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. दरम्यान या ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून आणखी तीन वाहनांना धडक देऊन उडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. kavthepeer-accident-woman-died-sangli-marathi-news-sml80           

सांगलीकडून दुधगावकडे माळी दांपत्य दुचाकीवरून निघाले होते. ट्रॅक्टरचालक दुधगावकडून सांगलीच्या दिशेने येत होता. भरधाव वेगात येणार्‍या ट्रॅक्टरने कवठेपिरान नजीक दुचाकीला समोरुन धडक दिली. ही धडक इतकी भीषण हाेती की त्यात दुचाकीवरील स्वाती या ट्रॅक्टरच्या चाका खाली गेल्या. त्यामुळे त्या चिरडल्या गेल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती accident news मिळताच घटनास्थळी गावकरी पाेचले व त्यांनी स्वप्निल यांना तातडीने येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. स्वाती यांचा मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

स्वाती ह्या गावात ई महा सेवा केंद्र चालवत होत्या. स्वप्नील हे चावडीत कामाला आहेत. दरम्यान ट्रॅक्टर चालकाने आणखी तीन वाहनांना धडक देऊन उडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. मात्र ते सर्वजण थोडक्यात बचावले. कवठेपिरान येथे अपघात झाल्यानंतर रस्त्यालगत असलेल्या खाणीत ट्रॅक्टर पलटी झाला होता.

Edited by : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Shock : शेतातील मोटार सुरु करताना घडले दुर्दैवी; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! महिला डॉक्टरवर २ पोलिसांकडून बलात्कार, मृत्यूपूर्वी हातावर सुसाईड नोट लिहिली, सातारा हादरलं

Stomach cancer: महिलांमध्ये लपलेली असतात पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास जीव वाचेल

Pune Politics: मुरलीधर मोहोळ यांच्याकडील पांढऱ्या रंगाची कार नेमकी कुणाची? रवींद्र धंगेकरांनी नव्या पोस्टद्वारे फोडला बॉम्ब

Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT