Satara Kass Road Closed, Satara News, Kass,  saam tv
महाराष्ट्र

Satara Kass Road Closed : वीकेंडचा प्लॅन केला आहे, थांबा ! यवतेश्वर, कास रस्ता वाहतुकीसाठी ठेवणार आहेत बंद (पाहा व्हिडीओ)

Satara Rain Updates : नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ओंकार कदम

Kass Valley of Flowers : सातारा शहरातून यवतेश्वर आणि कासला जाणारा रस्ता येत्या रविवारी (ता. 23 जूलै) आणि साेमवारी (ता.24) सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सातारकर नागरिकांसह पर्यटकांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra News)

काही दिवसांपूर्वी यवतेश्वर घाटात दरड पडून एक व्यक्ती जखमी झाला होता. या भागातील डोंगरावर अजून हि मोठे दगड धोकादायक स्थिती मध्ये आहेत. अतिवृष्टी तसेच भूस्सखलनामुळे सातारा तालुक्यातील सांबरवाडी हद्दीतील सातारा - यवतेश्वर - कास या घाटातील धोकादायक दरड अथवा दगड कोसळल्यास मोठया प्रमाणावर जीवीत व वित्त हानी होण्याची शक्यता आहे.

यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत सांबरवाडी येवतेश्वर घाटातील धोकादायक दरड आणि दगड फोडण्याचे काम 24 जुलै रोजी करण्यात येणार आहे.

त्यामुळे रविवार (23 जुलै) रात्री 12 वाजल्यापासून ते सोमवार (24 जुलै) रात्री 12 वाजेपर्यंत बोगदा ते यवतेश्वर- कास रस्ता सर्वप्रकारच्या वाहतूकीस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात येणाऱ्या पर्यटकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT