Satara, Kass Road, Bamnoli, Satara Rain Updates saam tv
महाराष्ट्र

Satara Rain Updates : पर्यटकांनाे सावधान ! कास तलावाचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले, कास गाव, बामणाेलीची वाहतुक वळवली; 'या' मार्गाचा वापर करा (पाहा व्हिडिओ)

Kass Talav Road : 21 जूलैपर्यंत नागरिकांनी शक्यतो पर्यटन स्थळी जाण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Siddharth Latkar

Satara Rain Updates : सातारा शहर व परिसरात आज (बुधवार) सकाळपासून संततधार पाऊस पडत आहे. पावसामुळे सखल भागात माेठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. परिणामी गणपतराव तपासे मार्गावरील (राधिक रस्ता) वाहतुक मंदावली आहे. दरम्यान कास परिसरात पावसाचा जाेर असल्याने कास तलावाचे पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. (Maharashtra News)

हवामान खात्याने 21 जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. यामुळे जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन केले आहे. तसेच पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय घेऊ नका, मोबाईलचा वापर करू नका, पाण्यात असाल तर त्वरित पाण्याबाहेर पडा अशा सूचना केल्या आहेत.

त्याव्यतरिक्त दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात, इमारतीत आश्रय घेऊ नका असेही नमूद केले आहे.

कास रस्ता वाहतुकीसाठी बंद

दरम्यान सततच्या पावसामुळे (rain) कास तलावाचे (Kass Talav) पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. त्यामुळे नेहमीचा प्रचलित रस्ता कास बंगला ते कास गाव हद्दीत असलेली फॉरेस्ट चौकी अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने कळविले आहे.

कास गाव आणि पुढे बामणोली भागात जाणाऱ्या नागरिकांनी कासाणी घाटाई मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT