Kasbe Digraj Bandh, Sangli News, Social Media saam tv
महाराष्ट्र

Social Media त आक्षेपार्ह पाेस्ट, युवक पाेलिसांच्या ताब्यात; कसबे डिग्रजला कडकडीत बंद

Kasbe Digraj Bandh Today : कसबे डिग्रज गावात शांतता असल्याची माहिती स्मिता पाटील (पोलिस उपनिरीक्षक) यांनी दिली.

विजय पाटील

Sangli News : कसबे डिग्रज गावात समाज माध्यमातून वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. पोलिसांनी स्टेटस ठेवणाऱ्या युवकास ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज (मंगळवार) कसबे डीग्रज ग्रामस्थांनी कडकडीत बंद (kasbe digraj bandh) पाळला आहे. (Maharashtra News)

सांगली (sangli) नजीकच्या कसबे डिग्रज गावात एका युवकाने वादग्रस्त स्टेटस (social media) ठेवल्यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी संबंधित युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गावामध्ये शांतता आहे. साेमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर गावातील ज्येष्ठ मंडळी आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

या घटनेचा निषेध म्हणून आज (मंगळवार) सकाळपासून कसबे डिग्रज गावातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पुकारला आहे. या बंदमध्ये गावातील प्रमुख बाजारपेठ मधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. याचबरोबर सकाळपासून गावामध्ये पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी सुद्धा वादग्रस्त पोस्ट ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या युवकावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ग्वाही पोलिसांनी ग्रामस्थांना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT