sharad pawar and chandrashekhar bawankule
sharad pawar and chandrashekhar bawankule  saam tv
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule: 'मला वाटतं त्यांनी..'; बावनकुळेंचा शरद पवारांना खोचक सल्ला; कसबा निकालावरून साधला निशाणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kasba Peth Byelection Result: राज्याच्या राजकारणात सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीच्या निकालाची चर्चा पाहायला मिळत आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेसने गुलाल उधळल्यानंतर भाजप नेत्यांवर चौफेर टीका होताना दिसत आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देशभरात बदलाची लाट असल्याचे सांगत भाजपवर निशाणा साधला होता.

त्यानंतर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या टिप्पणीवर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानावरून शरद पवारांना खोचक सल्ला दिला आहे. (Maharashtra Politics)

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे.....

शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी "चिंचवडमध्ये दोघांच्या मतांची बेरीज केली तरी आम्ही अधिक आहोत. आम्ही ५१ टक्क्यांची लढाई जिंकलीये. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ५१ टक्क्यांची लढाई जिंकून निवडून आल्या आहेत. एकीकडे ४ टक्के मागे पडलो आहोत. ही ४ टक्के मतं भरून काढणं ही आमची जबाबदारी आहे. पुन्हा जनतेमध्ये जाऊ. पुन्हा जनतेला विश्वासात घेऊ. काही आमच्याकडून चुकलं असेल तर ते दुरुस्त करू” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच "शरद पवारांनी काल तीन राज्यांचे निकाल बघितले नसतील.त्यांनी आज ते बघून घ्यावेत. संपूर्ण काँग्रेस साफ झालीये. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पक्ष जोडण्याचा प्रयत्न केला. पण उलट पक्ष कमी झाला. तीन राज्य हातातून गेले. शरद पवार जे सांगत आहेत ते कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी सांगत आहेत," असा टोलाही त्यांनी लगावला आहे..

काय म्हणाले होते शरद पवार.....

"कसबा आणि चिंचवड पोट निवडणूकीच्या निकालावर बोलताना आम्ही जी मतांची माहिती घेतली, त्यावरून तर फक्त दोन ठिकाणी भाजपाला जास्तीची मतं मिळाली. नाहीतर सरसकट सगळीकडे भाजपा मागे आहे. शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ अशा बहुसंख्य ठिकाणी रवींद्र धंगेकरांना जास्तीची मतं मिळाली. हा बदल आहे. हा बदल पुण्यात होतोय याचा अर्थ लोक वेगळ्या विचारात आहेत," हे स्पष्ट होत असल्याचे विधान शरद पवार यांनी केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT