महाराष्ट्र

Karni sena: मालेगावातील करणी सेनेच्या चिंतन सभेत भाजप कार्यकर्त्यांचा राडा; व्हिडिओ आला समोर

करणी सेनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा विरोध करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bjp Workers Chaos In Karni sena Program:

मालेगावात भाजपविरोधात होत असलेल्या चिंतन सभेत भाजप कार्यकर्त्यांनी राडा केलाय. सुभाष भामरेंच्याविरोधात करणी सेनेकडून चिंतन सभा घेतली जात होती. मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे ही बैठक सुरू होती. भाजप कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, करणी सेनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं होतं. पंरतु हा कार्यक्रम भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

लोकसभा निवडणूक २०२४ निष्क्रिय, भ्रष्ट व लबाड खासदार आयात उमेदवार चिंतन बैठक अश्या आशयाचे बॅनर या कार्यक्रमाच्या मंचावर लावण्यात आले होते. लोकसभा निवडणूक २०२४ निष्क्रिय, भ्रष्ट आणि लबाड खासदार आयात उमेदवार चिंतन बैठक अशा आशयाचे बॅनर या कार्यक्रमात लावण्यात आला होता होता. मिळालेल्या माहितीनुसार, करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती.

करणी सेनेच्या या बैठकीत धुळ्याचे अनिल गोटे, डॉ.विलास बच्छाव, श्याम सनेर यांच्यासह भाजपचा आणि काँग्रेसचा नाराज गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी राडा झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

करणी सेनेचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं सांगून भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोध केला जात होता. त्यांच्या उमेदवारीला विरोध केला जात होता. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला, असं तेथे उपस्थीत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Bhurji Recipe : नाश्ता अन् जेवणासाठी झटपट बनवा ढाबा स्टाईल पनीर भुर्जी

FSSAI Recruitment: ग्रॅज्युएट आहात? FSSAI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? वाचा

Kendra Yog 2025: उद्यापासून या राशींच्या नशीबाची दारं उघडणार; न्याय देवता शनी बनवणार पॉवरफुल योग

सोमवारी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करा हे 4 सोपे उपाय

Marathi Actor : मराठमोळ्या अभिनेत्याला मातृशोक; कर्करोगाशी झुंज अपयशी, सुनेने शेअर केली भावुक पोस्ट

SCROLL FOR NEXT