लातूर : कर्नाटकच्या (Karnataka Hijab) उडपी येथील मुस्लीम समाजातील विद्यार्थीनी (Muslim Girls) व महिलांना हिजाबमध्ये (Hijab) शिक्षण घेण्यास मज्जाव आणून महाविद्यालयात प्रवेश बंदी केल्यामुळे लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा इथं मुस्लिम महिलांकडून कर्नाटक सरकार विरोधात निलंगा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
हे देखील पहा :
कर्नाटकमधील (Karnataka) उडपी (Udipi) येथे घडलेला प्रकार निंदनिय असून मुस्लिम विद्यार्थिनींनी महाविद्यालयात बुरखा घालून येऊ नये असे म्हणणे म्हणजे देशविरोध असून देशाची व लोकशाहीची अब्रू घालवणारे आहे; असे या आंदोलनकर्त्या महिलांचे म्हणणे आहे. हिजाबे हिन्दोस्ता या संघटनेच्या वतीने या संदर्भात निवेदन देण्यात आले. कर्नाटकातल्या मुस्लीम (Muslim) समाजातील विद्यार्थीनी व महिला यांना हिजाब घालून शिक्षण घेण्यास जाचक अटी व नियम घालून असंवैधानिक पध्दतीने बंदी आणली आहे.
संविधानाच्या (Constitution) कलम १९ नुसार हा प्रकार मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार आहे. संविधानाने या देशातील नागरिकांना विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असून कोणी काय पोशाख घालायचा काय खायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असून संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आणि अधिकार दिलेले असताना संविधानाचा अपमान करुन अश्या नियम व अटी लावणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला चालविण्यात यावा अशी मागणी या महिलांनी केली.
कर्नाटकमध्ये हिजाबवरून जी घटना घडली त्या घटनेचा तीव्र निषेध करीत मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. हिजाब हा महिलांच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि अधिकाराचा प्रश्न आहे. जे संविधानाने दिले आहे ते मिळालेच पाहिजे असे म्हणत संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी निलंगा (Nilanga) उपविभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ज्या मानसिकतेपोटी हिजाबला विरोध करण्यात येत आहे त्या मानसिकतेच्या लोकांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम महिलांनी केली.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.