कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे याचा पराभव केला. निवडणुकीतील पराभवानंतर राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. पराभव जिव्हारी लागल्यामुळे यावेळी राम शिंदे भावुक झाले. पत्रकार परिषदेमध्येच ते रडू लागले. त्याचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांवर आरोप करताना सांगितले की, 'कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. हे आज दिसून आलंय. मी महायुतीचा धर्म पाहण्यासाठी अजित पवारांकडे मागणी करत होतो. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं असं अजित पवार आज रोहित पवारांना बोलले म्हणजे हा सुनियोजित कट होता. राजकीय सारीपाटात मी बळी ठरलोय. यासंदर्भात मी आगोदरच सांगितलं.'
अजित पवार आज साताऱ्यामध्ये यशवंत राव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंत राव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी रोहित पवारांना मी सभेला आलो एसतो तर काय झालं असतं असा मिश्किल टोला लगावला.
त्यांच्या या वक्तव्यानंतर राम शिंदे यांनी माध्यमांसमोर येत त्यांच्यावर अनेक आरोप केले. 'माध्यमांमध्ये बोलण्याची माझी इच्छा नव्हती मात्र दादा बोलले त्यामुळे मी बोलतोय. मला वाटतं की कौटुंबिक वादादरम्यान काही करार झाले त्याचे प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवला.', असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.