Crime News
Crime News  saam tv
महाराष्ट्र

Karad: काळीज पिळवटून टाकणारी घटना! धान्यात टाकणाऱ्या पावडरीने जाणवू लागला त्रास; बहिण भावाचा दुर्देवी मृत्यू

Gangappa Pujari

Karad News: कराड तालुक्यातील मुंडे येथील दोन चिमुकल्या भाऊ- बहिणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. धान्याची साठवणूक करत असताना त्यात टाकल्या जाणाऱ्या पावडरीच्या उग्र वासाने चिमुकल्या दोघांनाही त्रास होत होता.

यामुळे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्लोक अरविंद माळी (वय 3 वर्षे) व तनिष्क अरविंद माळी (वय 7, दोघेही रा. मुंढे, ता. कराड) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Karad News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंढे येथील अरविंद माळी यांच्या घरात धान्य साठवून ठेवत असताना त्यामध्ये पावडरीचा वापर केला होता. त्या पावडरचा उग्र वास घरात येत होता. या उग्र वासामुळेच श्लोक व तनिष्का यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यामुळे सोमवार दिनांक 13 रोजी प्रथम तीन वर्षाच्या श्लोकला उलट्या व खोकल्याचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी त्याला कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र उपचार सुरू असतानाच सोमवारी त्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्याची मोठी सात वर्षांची बहीण तनिष्कालाही उलट्या व खोकल्याचा त्रास होऊ लागला.

दरम्यान उपचार सुरू असताना तिचाही मंगळवारी मृत्यू झाला. तीन वर्षाच्या श्लोकच्या मृतदेहाचे शवाविच्छेदन केल्यानंतर त्यामध्ये आंतरगत अति रक्तस्त्रावामुळे व शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघा सख्ख्या बहिण भावांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

Faf Du Plessis Catch: उडता फाफ! डू प्लेसिसने हवेत उडी मारत एका हाताने घेतला भन्नाट झेल- Video

Today's Marathi News Live: कल्याणमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

SCROLL FOR NEXT