Mla Nitesh rane  Saam Tv
महाराष्ट्र

Nitesh Rane News : भाजप आमदार नितेश राणे अडचणीत? कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा, कारण?

साम टिव्ही ब्युरो

विनायक वंजारे

Nitesh Rane News : कणकवलीत मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कणकवली पोलीस स्थानकात आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपच्या १३ जणांवर गुन्हे नोंद केले आहेत. राणे यांच्यासहित कार्यकर्त्यांनी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. (Latest Marathi News)

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भुट्टो वक्तव्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कोकणातही दिसले. आज, शनिवारी नितेश राणे (Nitesh Rane) व भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

मात्र, जिल्ह्यात मनाई आदेश असताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याने नितेश राणे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कणकवली पोलीस स्थानकात आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपच्या 13 जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

काय आहे संपूर्ण वाद?

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. भुट्टो म्हणाले, 'ओसामा बिन लादेन मेला, पण गुजरातचा कसाई जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे'. भुट्टो यांच्या या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भुट्टो यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांकडून निषेध केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

SCROLL FOR NEXT