Shinde Shiv sena vs Thackeray shiv sena Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'अशी युती कुठेही नाही!' शिंदेंच्या नेत्याकडून ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन; राजकीय वर्तुळात चर्चा

Kalyan Political News: कल्याणमध्ये शिंदे आणि ठाकरे गट दोन्हीही एकत्र आल्याचे चित्र समोर आलं आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Manasvi Choudhary

Kalyan Political News Shinde Shiv sena And Thackeray shiv sena: राज्यभरात ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष सातत्याने पाहायला मिळत असताना, कल्याणमध्ये मात्र चित्र वेगळे आहे. या दोन्ही गटातील नगरसेवकांच्या मैत्रीचे अनोखे चित्र समोर आले आहे. कल्याण पूर्वेतील द्वारली परिसरात ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांच्या नवीन कार्यलयाचे उद्घाटन पार पडले. या कार्यालयाचे उद्घाटन शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या घडामोडीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात दोन्ही शिवसेनांमध्ये राजकीय वैराचे वातावरण असताना, कल्याणमध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. उद्घाटन कार्यक्रमावेळी दोन्ही गटातील कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यामुळे 'अशी युती कुठेही नाही' अशा चर्चांना उधाण आले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, मला उद्घाटनासाठी आमंत्रण देण्यात आले होते. निलेश खंबायत यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.

तर ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबायत यांनीही या कार्यक्रमाला कोणताही राजकीय रंग नसल्याचे स्पष्ट केले. आमच्यात कोणतेही पक्षभेद नाहीत. कुणाल पाटील यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. मोठा भाऊ म्हणून मी त्यांना उद्घाटनासाठी बोलावले. याचा दुसरा कोणताही अर्थ काढू नये,असे त्यांनी सांगितले. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध कायम असल्याचे हे उदाहरण सध्या कल्याणमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यातील संकल्प दहीहंडी उत्सवाला सुरुवात

High cholesterol: डाएटींग केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं नसांना चिकटलेली चरबी कशी कमी कराल, जाणून घ्या

Kalyan Latur Expressway : कल्याणवरून लातूरला पोहचा फक्त ४ तासांत, नवा महामार्ग होतोय तयार; कुठून कसा करता येणार प्रवास?

Shocking: विद्यार्थ्याच्या कपाळावरचा टिळा पुसला, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शिक्षिकेचे तडकाफडकी निलंबन

Shravan Somvar : उपवासाला फक्त ३० मिनिटांत बनवा पारंपरिक फलाहारी थाळी, चवही भारी अन् आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT