Kalyan Politics Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Politics : कल्याण पूर्वेत भाजप- शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच; शिवसेना शहर प्रमुखाचे झळकले बॅनर

Kalyan News : महेश गायकवाड यांचे वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत बॅनर लागल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अनेक विधानसभा मतदार संघावर दवे प्रतिदावे केले जात आहेत. अशातच कल्याण पूर्वेत भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

कल्याण (Kalyan) पूर्वेत शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे भावी आमदार या आशयाचे बॅनर झळकल्याने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. एकीकडे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणाऱ्या (BJP) भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांनी भाजपकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे महेश गायकवाड यांचे वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत बॅनर लागल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्व मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. 

शिंदे गटातून तिघे इच्छुक 

शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, विधानसभा प्रमुख निलेश शिंदे, पदाधिकरी विशाल पावशे हे इच्छुक असून त्यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी देखील सुरू आहे. मात्र या मतदार संघात भाजपचे आमदार गणपत गायकवाड आहेत. त्यामुळे भाजपने ही जागा आमच्याकडेच राहिल असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या जागेवरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता जागा वाटपाच्या वाटाघाटीत जागा कुणाच्या वाट्याला जाते, युतीतील वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT