Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News: चोरट्यांकडून पुन्हा पोलिसांवर हल्ला, आठ पोलिस जखमी; आंबिवली इराणी वस्तीतील घटना

Kalyan News : अंधेरी पोलिस ठाण्याचे पोलिस एका आरोपीच्या शोधात आले होते. त्यांच्यासोबत खडकपाडा पाेलिस ठाण्याचे काही पोलिस गेले होते

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: चोरीच्या घटनेतील एक संशयित इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या सराईत इराणी (kalyan) चोरट्याला अटक करण्यास गेलेल्या पोलीसांवर इराणी चोरट्यासह २० ते २५ जणांच्या जमावाने दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात आठ ते दहा पोलीस (police) जखमी झालेत. ही धक्कादायक घटना कल्याणजवळ आंबिवली येथील इराणी वस्तीत घडली. (Maharashtra News)

कल्याणजवळील आंबिवली परिसरात इराणी वस्ती असून या वस्तीला चोरट्यांची वस्ती म्हणून ओळखले जाते. चैन स्नेचिंग, भूलथापा मारुन अनेक लाखो नागरीकांना आत्तापर्यंत यांनी लूटले आहे. जिल्ह्यात राज्यात नव्हे तर देशभरात या इराणी चोरट्यांचे जाळे पसरले आहे. पोलिस या इराणी चोरट्यांना पकडण्यासाठी जातात; मात्र अनेकदा या वस्तीमधील इराणी पोलिस पथकावर हल्ले करतात. या हल्ल्यात (Crime News) महिलांचा देखील समावेश असतो. दरम्यान अंधेरी पोलिस ठाण्याचे पोलिस एका आरोपीच्या शोधात आले होते. त्यांच्यासोबत खडकपाडा पाेलिस ठाण्याचे काही पोलिस गेले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दगडफेकीच्या गोंधळात दोन आरोपी फरार 

वस्तीतून रात्री २ वाजताच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने तीन इराणी चोरट्यांना ताब्यात घेतलं. तिघांना घेऊन परत जात असताना इराणी वस्तीतील महिला- पुरुष आणि चोरट्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना विरोध करत दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत १० पोलिस जखमी झाले. रात्री अंधार असल्याने त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती होती. गोंधळाचा फायदा घेत अटक करण्यात आलेल्या तीन मधील दोन चोरट्यानी पळ काढला. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीत महिला पुरुषांचा समावेश आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

Prajakta Mali Cannes look: प्राजक्ता माळीची कान्समध्ये मराठमोळी एंट्री; नऊवारी साडीतील लूकची परदेशी फोटोग्राफर्सनाही पडली भुरळ

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT