Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News: इन्व्हर्टर, वाहनाच्या बॅटऱ्यांची चोरी; तीन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News: इन्व्हर्टर, वाहनाच्या बॅटऱ्यांची चोरी; तीन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : बॅटरीच्या दुकानाची रेकी करत रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून महागड्या बॅटऱ्या चोरणाऱ्या त्रिकूटाला (Kalyan) कल्याण मधील कोळशेवाडी पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या. ही टोळी इन्व्हर्टर व गाड्यांच्या बॅटरीची चोरी करत होती. (Live Marathi News)

कल्याण मधील पूर्वेकडील चक्की नाका परिसरात एका बॅटरीच्या दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करत लाखो रुपयांची बॅटरी चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरू केला. चोरट्यांची ओळख पटवून पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच टोळीला बेड्या ठोकल्या. नौशाद खान, मुजीब खान, सलमान खान अशी या तीन चोरट्यांची नावे असून हे तिघे मुंब्रा कसा येथील राहणारे आहेत. 

अडीच लाखाच्या बॅटरी जप्त 

या तिघांकडून वाहनाची, इन्व्हर्टरची बॅटरी अशा अडीच लाख रुपये किमतीच्या बॅटरी व एक गाडी जप्त करण्यात आली आहे. हे चोरटे वाहनांची व इन्व्हर्टरला लागणारा बॅटरी चोरी करायचे. यासाठी ते बॅटरीच्या दुकानांची रेकी करत व रात्रीच्या सुमारास संधी साधत या दुकानांमधील बॅटरी चोरी करायचे.  दोघांविरोधात यात देखील बॅटरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार जयंत पाटलांना धक्का; ईश्वरपूर नगराध्यक्षांचं पद रद्द

Thane DCC Bank Election: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कथोरे गटाचं वर्चस्व; रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा करिष्मा

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा आहे? घरी बनवा मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट रस मलाई; वाचा रेसिपी

जेवण उशिरा दिल्याच्या रागातून रक्तरंजित थरार! भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT