Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News : दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी; चांदीची गदा, हारसह दानपेटीतील रोकड लंपास

दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी; चांदीची गदा, हारसह दानपेटीतील रोकड लंपास

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: कल्याणमधील आग्रा रोडवरील प्रसिद्ध असलेल्या दक्षिण मुखी मारुती मंदिरात चोरी झाल्याचे (Kalyan) समोर आले आहे. यात चोरट्यांनी चांदीची गदा, चांदीचा हार, चांदीच्या छत्रासह दानपेटीतील (Theft) रोकड चोरीला नेली आहे. (Latest Marathi News)

सदर चोरीची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. कल्याणमधील दक्षिण मुखी हनुमान मंदिरातील पुजारी काल रात्रीच्या सुमारास मंदिर बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री एक ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरवाजाचा टाळा तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील सव्वा किलोची चांदीची गदा, चांदीचा हार, चांदीचे छत्र, चांदीचा मुकुट यासह दानपेटीतील रोकड देखील चोरून नेले. 

सीसीटीव्ही कॅमेरासह डीव्हीआरही चोरला 

चोरट्याने पकडले जाऊ नये, म्हणून या मंदिरातील वायफायचे राऊटर, (CCTV) सीसीटीव्ही कॅमेरासह डीव्हीआर देखील चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कल्याण बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates: वेळेत मतदान केंद्रावर येऊनही मतदान करण्यास नकार, कोल्हापुरात तरुणींचा संताप

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

Saam Tv Exit Poll: मालेगावमध्ये एमआयएम सर्वात मोठा पक्ष, कुणाची सत्ता येणार?

Night Habits: रात्रीच्या या 5 वाईट सवयींचा आरोग्यावर होतो परिणाम

SaamTV Exit Poll: सांगलीचं मैदान भाजपनं मारलं; एकहाती सत्ता राहणार?

SCROLL FOR NEXT