Khadakpada Police Saam tv
महाराष्ट्र

Khadakpada Police : ठाणे जिल्ह्यात प्रथमच १७ ड्रग्ज तस्करांवर मोक्का; ११५ किलो गांजासह १३ जणांना अटक

Ganja Seized in Kalyan: टोळी ठाणे, कल्याण, बदलापूर, सोलापूर, पुणे आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी गांजा विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या सर्व आरोपीं विरोधात आता मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करत कारवाई

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे

कल्याण : ड्रग्स तस्करी होत असल्याचे वारंवार समोर येत असून ठाणे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांनी १७ ड्रग्स तस्करांवर मोक्का अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांनी १३ जणांना अटक करण्यात आली असून चार जण फरार झाले आहेत. 

कल्याण खडकपाडा पोलिसांनी या महिन्यात गांजा सेवन करणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं. तरुणाची चौकशी करत गांजा कुठून घेतला; याची चौकशी पोलिसांनी सुरू केली असता गांजा तस्करीचे धागेदोरे कल्याण, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणेपासून थेट विशाखापट्टणमच्या जंगलापर्यंत पोहोचले. कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली एसीपी कल्याण घेटे, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे, डीसीपी स्कॉडचे पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने रॅकेटचा तपास सुरू केला.

१३ जणांना घेतले ताब्यात 

तपास करत आतापर्यत पोलिसांनी ११५ किलो गांजा, पिस्तुले, काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह आरोपी संपर्कासाठी वापरत असलेली वॉकी टॉकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या गुन्ह्याची पाळेमुळे थेट विशाखापट्टणम येथील जंगलापर्यत पोचल्याचे कळताच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखालील खडकपाडा पोलिस ठाण्याच्या पथकाने टोळीचा म्होरक्या गुफरान हन्नान शेख याच्यासह टीटवाळा बनेली परिसरात राहणाऱ्या आरोपीसह १३ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे

७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

खडकपाडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत विशाखापट्टणम ते कल्याण असा पसरलेला अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजा, वाहने, पिस्तूल, वॉकी- टॉकीसह तब्बल ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या टोळीविरोधात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे तसेच तेलंगणा राज्यातही अनेक गुन्हे नोंद आहेत. कल्याण जवळील बल्यानी येथे राहणारा गुफरान शेख हा टोळीचा म्होरक्या होता. पोलिसांनी गुफारान शेखसह टोळीतील १७ जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली. दरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपींविरोधात २० पेक्षा जास्त गुन्हे मुंबई ठाणे पुणे नाशिक सह तेलंगणा राज्यात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mouth Ulcer Symptoms: तोंड येण्यापुर्वी कोणती लक्षणे दिसतात?

'तु कोण आहेस रे? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर प्रहार, दिलं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आव्हान

Maharashtra Politics: अजित पवारांविरोधात मोहोळ यांचा शड्डू; पवारांच्या वर्चस्वाला भाजपकडून सुरुंग?

Sachin Ghaiwal: 'मंत्रिमंडळ की गुंडांची टोळी'; सचिन घायवळच्या शस्त्रपरवान्यावरुन राऊतांचा प्रहार

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

SCROLL FOR NEXT