Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: मुंबई पोलिसांच्या पथकावर दगडफेक; नागरिकांची लूट करणाऱ्याना ताब्यात घेताना विरोध

मुंबई पोलिसांच्या पथकावर दगडफेक; नागरिकांची लूट करणाऱ्याना ताब्यात घेतण्याला विरोध

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुबाडणाऱ्या भामट्याला मुंबई डी. एन. नगर पोलिसांनी कल्याण जवळच्या आंबीवली इराणी वस्तीतून बेड्या ठोकल्या. फिरोज खान असे या (Kalyan) चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी फिरोजला अटक केली. यावेळी नातेवाईकांनी पोलिसांना जोरदार विरोध केला. (Mumbai Police) पोलिसांवर, गाड्यावर दगडफेक केली. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या धाडसाने प्रतिकार करत फिरोजला ताब्यात घेतलं. अटकेचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Maharashtra News)

पोलीस असल्याची बतावणी करत एका इसमाला तब्बल एक लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना मुंबई अंधेरी परिसरात घडली होती. या प्रकरणी अंधेरी डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या भामट्याचा शोध पोलिसांनी सुरु केला. याच दरम्यान तपासण्यात येणाऱ्या एका सिसिटीव्ही फुटेजमध्ये हा भामटा दिसून आला. तपासादरम्यान फिरोज खान असून हा अनेक गुन्ह्यात फरार असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याचा ठाव ठिकाणा शोधला. फिरोज हा कल्याण जवळच्या (Ambivali) आंबिवली येथील इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांना त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. वस्तीत आधी एक महिला आली. ती महिला बुरखा घालून आली होती. ती पोलिस होती. फिरोज कुठे दिसतोय का हे शोध होते. अचानक फिरोज एका सलूनमध्ये दाढी करताना दिसून आला. या महिला पोलिसाने वस्ती बाहेर थांबलेल्या पोलिसांना माहिती दिली. कोणालाही संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी यावेळी एक खासगी गाडी तसेच शाळेची व्हॅन सोबत ठेवली होती. पोलिसांनी फिरोजला पकडले. या दरम्यान आरोपीच्या नातेवाईकांनी  पोलिसांवर दगडफेक केली. पोलिस व त्यांच्यात झटापट झाली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. फिरोज याच्या विरोधात ३५ गुन्हे दाखल आहेत. गेल्या २० वर्षापासून या इराणी वस्तीत चोरट्यांना पकडण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांवर तहल्ले होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT