Shiv Sena KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News: मराठी पाट्यावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक; केडीएमसीकडून अद्याप कारवाई नाही

Kalyan News : राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबरला संपली

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख 

कल्याण : मराठी भाषेत फलक न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. (Kalyan) कल्याण- डोंबिवलीमध्ये अनेक दुकानांवर आजही इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये फलक आहेत यावरून शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी  व्यवसाय व दुकाने आस्थपणा नोंदणी विभागाच्या उपायुक्तांना फोन करून धारेवर धरले. (Tajya Batmya)

राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबरला संपली. त्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलने केली. मुंबई महापालिका क्षेत्रात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदाराविरोधात कारवाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र कारवाईसाठी मुहूर्त मिळालेला नाही. याबाबत केडीएमसीने मराठी भाषेत फलक लावण्यासाठी संबंधित दुकानदारांना वारंवार आवाहन केल्याचे सांगितले. तर कारवाईचे अधिकार व्यवसाय व दुकाने आस्थापना नोंदणी विभागाकडे असल्याचे केडीएमसीने स्पष्ट केले. याबाबत शिवसेना शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना फोन करत चांगलेच धारेवर धरले. संबांधीत अधिकाऱ्याने यावर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतापलेल्या कदम यांनी महाराष्ट्रात मराठी पाट्या असाव्यात असं वाटत नाही का? तुम्हाला आंदोलनाचीच भाषा समजते का असा संतप्त सवाल केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: लग्नाच्या सिझनमध्ये आज सोन्याचे भाव वाढले, पाहा १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Maharashtra Election : मतदानाआधीच ठाकरेंना मोठा धक्का, जिल्हाप्रमुखाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Business Idea: घराच्या छतावर सुरु करा व्यवसाय, महिन्याला कमवाल लाखो रुपये; कसं? जाणून घ्या

Health: ऑपरेशनशिवाय रक्तवाहिन्या होतील साफ, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 'या' ५ पानांचं करा सेवन

Shri Ganesha: 'धमाल रोड ट्रिपची कमाल गोष्ट...' हास्य-विनोदाचा कल्ला करणारा 'श्री गणेशा'चा टिझर रिलीज

SCROLL FOR NEXT