KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर महापालिकेला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याची अधिकाऱ्याला तंबी

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, नांदीवलीसह आजूबाजूच्या गावामध्ये नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या पाणी टंचाईच्या समस्येबाबत निवेदन देऊन देखील समस्या सुटत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी केडीएमसीच्या आय प्रभागावर हंडा मोर्चा काढत अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.

कल्याण (Kalyan) पूर्वेतील चिंचपाडा, नांदीवली गावांसह आसपासच्या परिसरात नागरिक कमी दाबाने व अपूर्ण स्वरूपात होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. पाणी टंचाईची समस्या भेडसावत असल्याने नागरिकांनी आंदोलने केली, निवेदने दिली, पाठपुरावा केला. मात्र पाणी समस्या सुटली नाही. यामुळे आज शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महिलांनी (KDMC News) केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयावर हंडा कळशी मोर्चा काढला.

महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्याला घेराव घालत पाण्याच्या समस्यांबाबत जाब विचारला. पाण्याची समस्या लवकर सुटली नाही, तर एकही अधिकाऱ्याला खुर्चीत बसून दिले जाणार नाही, केडीएमसी कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा त्यांनी प्रभागातील अधिकाऱ्याला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : मनसे नेते प्रकाश महाजन यांचं तहसील कार्यालयासमोर उपोषण

Pune Crime : शाळकरी मुलीवर अत्याचार, इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं; 'गुड टच, बॅड टच'मुळं धक्कादायक घटना उघड

Nitin Gadkari: माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट, नितीन गडकरी यांनी सांगितला 'तो' प्रसंग

Shambhuraj Desai on Dhangar Reservation : धनगर आरक्षणासंदर्भात शंभुराज देसाईंची महत्वाची प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

SCROLL FOR NEXT