Kalyan News Railway Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: धावत्या एक्स्प्रेसमध्ये धक्‍कादायक प्रकार; आई झोपलेली असताना दीड वर्षाची मुलगी अचानक झाली गायब

धावत्या एक्स्प्रेसमध्ये धक्‍कादायक प्रकार; आई झोपलेली असताना दीड वर्षाची मुलगी अचानक झाली गायब

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये एका दीड वर्षाच्या चिमुकलीला चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला (Kalyan) प्रवाशांनी पकडून कल्याण जीआरपी पोलिसांच्या (Railway Police) ताब्यात दिले आहे. सलीम पठाण असे या चोरट्याचे नाव असून तो नाशिक येथे राहणारा आहे. (Latest Marathi News)

वसई येथील नालासोपारा परिसरात राहणारे राकेश गुप्ता हे त्यांची पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी सृष्टीला घेऊन साईनगर शिर्डी एक्सप्रेसने प्रवास करीत होते. आज (९ मे) पहाटे एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने येत असताना तिची आई झोपली होती. तर वडिल लघूशंकेसाठी गेले होते. हि संधी साधत सृष्टीला एका व्यक्तीने स्वत: जवळ घेतले. तो तिला घेऊन जात असताना काही सर्तक प्रवाशांची नजर त्याच्यावर पडली. काही प्रवाशांनी त्याला याबाबत हटकत विचारपूस केली. तो व्यक्ती काही उत्तर देत नव्हता.

आईला जाग आली अन्‌ झाला उलगडा

दरम्यान मुलीची झोपलेली आई जागी झाली. तिने ही माझी मुलगी असल्याचे सांगितले. तत्काळ प्रवाशांनी त्या व्यक्तिला पकडले. गाडी कल्याण स्थानकात येताच त्याला कल्याण जीआरपी पोलीसांच्या ताब्यात दिले. सलीम पठाण असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडे तिकीट नव्हते. सलीम पठाणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ (Police) पोलिस निरिक्षक मुकेश ढगे, पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख, पोलिस अधिकारी अनिल जवले, तपास अधिकारी खेतमाली, पोलिस कर्मचारी अभिजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सलीम पठाण हा नाशिक येथील येवल्याचा राहणारा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! हॉस्पिटलमधील आयसीयूत उंदीर चावलेल्या महिलेचा मृत्यू

Battle Of Galwan New Title: 'बॅटल ऑफ गलवान'चं नाव बदललं; सलमान खानचा चित्रपट आता 'या' नावाने होणार प्रदर्शित

Maharashtra Live News Update: नाशिकच्या इगतपुरीत अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणाने खळबळ

कोणाचा मृत्यू झाला तर घरात चूल का पेटवत नाहीत? काय आहे वैज्ञानिक कारण

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन, सोशल मीडियावर केली भावुक पोस्ट

SCROLL FOR NEXT