Kalyan News Aadharwadi Jail Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : कारागृहात कैद्याकडे मोबाईल; कारवाई न केल्‍याने कारागृह अधिक्षक निलंबित

कारागृहात कैद्याकडे मोबाईल; कारवाई न केल्‍याने कारागृह अधिक्षक निलंबित

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : आधारवाडी कारागृहातील कैद्याकडून मोबाईल सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. तपासाअंती आधारवाडी (Aadharwadi) कारागृहाचे अधीक्षक ए. एस. सदाफुले यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येणार आहे. कैद्यांकडे मोबाईल (Kalyan) सापडल्यानंतरही सदाफुले यांनी ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. (Tajya Batmya)

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैद्याकडे मोबाईल सापडण्याचा घटना अनेकदा घडल्या आहेत. कैदी आपल्या नातेवाईकांना मित्र आणि इतर कामाकरीता लपूनछपून मोबाईलचा वापर करतात. विशेष म्हणजे त्यांना हा मोबाईल कुठून आणि कसा पुरविला जातो याचा तपास होत नाही. कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात आधारवाडी कारागृहात मोबाईल आणि अन्य वस्तू सापडल्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यांच्या तपासाचे पुढे काय झाले हे जेल प्रशासनाकडून सांगण्यात येत नाही.

असाच एक प्रकार मे जूनमध्ये झाला होता. सर्च ऑपरेशनमध्ये कैद्याकडे १५ मोबाईल सापडले हाेते. मोबाईल सापडल्यावर जेल प्रशासनाकडून ठोस कारवाई व्हायला हवी होती, ती झाली नाही. या प्रकरणात विभागाकडून कल्याणचे कारागृह अधीक्षक अंकुश सदाफुले यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यांच्या निलंबनानंतर पुढील चौकशी होणार आहे. मोबाईल सापल्यानंतर ठोस कारवाई आणि योग्य ती कारवाई न केल्याचा ठपका ठेवत सदाफुले यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

मोबाईल सापडल्यानंतर आत्ता कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षकांच्या विरोधात कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात अंकुश सदाफुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले ३१ वर्षापासून सेवा केली. या ३१ वर्षात २१ प्रशस्ती पत्रके आणि पाच रोख पारितोषिके मिळाली आहेत. जेल मध्ये एकही मोबाईलही सापडला नाही. मला दाखावावेत कुठे मोबाईल सापडले. मला सेवेत बढती मिळणार आहे म्हणून माझ्या विरोधात जाणीवपूर्व अन्यायकारक कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT