Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

MLA Raju Patil News : तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे करू; मनसे आमदाराचा केडीएमसीला थेट इशारा

Kalyan News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी ठाणे नियोजन भवन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: यंदा झालेल्या पावसाळ्यात कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे दोन दिवसात खड्डे भरले नाही, तर पालिका अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात उभे करू; असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसीला दिला आहे. 

गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र (Kalyan) कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. खड्ड्यांवरून सत्ताधारी पक्षाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठोपाठ आता (MLA Raju Patil) मनसे आमदार राजू पाटील देखील आक्रमक झाले आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी ठाणे  नियोजन भवन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस सर्व महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते. यावेळी खड्डे भरण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. 

दरम्यान इतक्या वर्षाचा अनुभव पाहता अधिकाऱ्यांना आंदोलन केल्याशिवाय दट्ट्या दाखवल्याशिवाय काम होत नाही. मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रभागातले खड्ड्यांचे फोटो पाठवण्यास सांगितले आहे. पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार रस्त्यांवर पडलेले खड्डे दोन दिवसात भरले नाही, तर पालिका अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात उभे करू; असा इशारा देखील आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

Triglycerides in children : पालकांची चिंता वाढली; ५ ते ९ वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय भयंकर आजार

SCROLL FOR NEXT