Anurag Thakur Saam tv
महाराष्ट्र

Anurag Thakur: आम्ही मिळून व ताकदीने लढू; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर

आम्ही मिळून व ताकदीने लढू; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्‍याण : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दुसऱ्यांदा दौरा होतोय. त्यामुळे या मतदार संघावर (BJP) भाजपची नजर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याबाबत अनुराग ठाकूर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आम्ही मिळून लढू व ताकदीने लढू तुम्ही चिंता करू नका; अशी प्रतिक्रीया मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. (Maharashtra News)

यंदा मोठा विजय संपादन करू असे बोलत अप्रत्यक्षरीत्या मतदारसंघ युतीत लढणार असल्याचे संकेत दिले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज डोंबिवलीत आले आहेत. कल्याण (Kalyan News) लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्राचा आज ते डोंबिवलीत आढावा घेणार आहेत. यावेळी सहा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

योग्यता व क्षमतेवर घेण्यात येते

जेडीयू नेता गुलाम रसूल यांनी आतंकवाद थांबवायचा असेल तर मुस्लिम तरुणांना सैन्यात संधी द्या; असं वक्तव्य केलं होतं. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देशात खेळाचा संघ असेल किंवा सैन्य असेल जाती-धर्माच्या आधारावर नव्हे, तर त्यांच्या योग्यता व क्षमतेवर घेण्यात येत असल्‍याचा टोला लगावला.

आधी केलेला घोटाळ्यांवर उत्तर द्यावे

संजय राऊत यांनी फडणवीस दहावा अजुबा आहे व आधीचे दोन अजुबे हे दिल्लीत बसले असल्याचे टीका केली होती. या टीकेवर ठाकूर यांनी प्रत्युत्तर देत जे असं वक्तव्य करतात त्यांच्यावर विश्वास कोण ठेवतो. जे घोटाळे केले त्याच्यावर त्यांनी आधी उत्तर द्यावेत असा पलटवांर संजय राऊत यांच्यावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीचा थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

SCROLL FOR NEXT