KDMC News
KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : कॉलेज परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर बुलडोझर; पुणे ठाण्यानंतर कल्याणमध्ये केडीएमसीची कारवाई

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: पुण्याच्या घटनेनंतर राज्यभरात बेकायदेशीर पब, बार व ढाब्यांवर बुलडोझर कारवाई सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे, ठाणेमध्ये कारवाई करण्यात आली आहे. यानंतर आता केडीएमसीने देखील महाविद्यालय, शाळा परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. 

पुण्यातील घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात शाळा, कॉलेज परिसरातील अवैधरित्या सुरु असलेल्या ढाबे आणि टपऱ्याविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे, ठाणे आदी शहरात कारवाई सुरु झाली आहे. यानंतर कल्याणमध्ये (Kalyan) देखील कारवाई सुरु करण्यात आली असून केडीएमसीचे आयुक्त इंदूराणी जाखड, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेत शहरात किती बेकायदा ढाबे, बार याची माहिती घेण्यात आली. त्यानुसार आजपासून या कारवाईला सुरुवात झाली असल्याची माहिती आयुक्त जाखड यांनी दिली आहे.  

बिर्ला कॉलेजच्या रस्त्याजवळील टपऱ्या जेसीबीने पाडण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या कारवाईस दुकानदारांनी विराेध केला. तरी देखील विरोध न जुमानता ही कारवाई करण्यात आली. कारवाईबाबत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी छाया वाघमारे यांनी विरोध केला आहे. कारवाईबाबत बोलताना वाघमारे यांनी बिर्ला कॉलेज परिसरातील टपऱ्या गेल्या ३० वर्षांपासून या ठिकाणी आहेत. विद्यार्थ्यांसाठी आहे त्या ठिकाणी चहा, पेन, वही विकले जातात. या स्टॉल्सवरून कुठलेही अमली पदार्थ विकले जात नाही. (KDMC) महापालिकेने त्यांना परवाना द्यावा व ठाणे मुंबईच्या धर्तीवर स्मार्ट स्टोल्स द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र याबाबत केडीएमसी आयुक्त जाखड यांनी कोणतेही अवेध धंदे करु द्यायचे नाहीत असे मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश असल्याचे सांगितले. त्या संदर्भातील आदेश महापालिका, पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकारी वर्गास दिले आहे. कारवाईत कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही; असा इशारा दिला.

त्या हुक्का पार्लरवर कारवाई होणार
कल्याणमध्ये एका हुक्का पार्लरचा व्हीडीओ व्हायरल झाल्याचा बातम्या प्रसारित झाल्या आहेत. संबंधित हुक्का पार्लर कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग कार्यक्षेत्रातील आहे. संबंधित पोलिस अधिकारी, महापालिका आधिकारी, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी यांच्याकडे त्वरीत माहिती घेऊन कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे आयुक्त जाखड यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT