Kolsewadi Police Saam tv
महाराष्ट्र

Kolsewadi Police : कल्याण पूर्वेतुन घुसखोर बांगलादेशी दाम्पत्याला अटक; सात वर्षांपासून होते वास्तव्यास

Kalyan News : कल्याणच्या कोळशेवाडी पोलीसांनी कल्याण पूर्वेतून घुसखोर बांगलादेशी दाम्पत्याला अटक केली आहे. कमल हसन आणि अंजुरा हसन असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पती- पत्नीचे नावे आहेत

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण पूर्वेतून उल्हासनगर क्राईम ब्रँच आणि कोळशेवाडी पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर दाम्पत्याला गुन्हा दाखल करत अटक केली आहे. हसन आणि अंजुरा हसन असे या दोघांची नावे आहेत. हे दोघे मागील सात ते आठ वर्षांपासून कल्याण पूर्वच्या विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास होते. 

कल्याणच्या कोळशेवाडी पोलीसांनी कल्याण पूर्वेतून घुसखोर बांगलादेशी दाम्पत्याला अटक केली आहे. कमल हसन आणि अंजुरा हसन असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पती- पत्नीचे नावे आहेत. कमल हा कल्याणमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तर अंजुरा ही एका बारमध्ये काम करत होती. मागील काही वर्षांपासून हे दाम्पत्य परिसरात वास्तव्यास असताना याबाबत कोणालाही माहिती नव्हती. 

दरम्यान दोघे पती- पत्नी कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात चाळीत भाड्याने घर घेऊन राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत या दोघांना ताब्यात घेतले आहे. सात ते आठ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करत बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान दोघांना ताब्यात घेल्यानंतर पोलिसांकडून हसन दाम्पत्यासोबत आणखी कुणी बांगलादेशी नागरिक परिसरात किंवा शहरात अन्य कोणत्या ठिकाणी आहेत का? किती वर्षांपासून ते इथे राहतात. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. चौकशीअंती आणखी काही माहिती बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

Heart Attack : बाहेरून फिट दिसत असलात तरी सावध! हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकतात या ४ गोष्टी

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

SCROLL FOR NEXT