Kalyan Titwala News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : पार्किंगच्या वादातून स्वतःची दुचाकी पेटवून होमगार्डची रेल्वेसमोर उडी; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

Kalyan News : इमारतीमध्ये भूषणचे पार्किंग वरून चार जणांसोबत वाद झाले होते. याच वादातून भूषणने काही दिवसांपूर्वी आपली दुचाकी पेटवून दिली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: इमारतीमध्ये पार्किंगवरून सुरू असलेल्या वादामुळे आलेल्या मानसिक तणावातून एका होमगार्डने टिटवाळा (Titwala) स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकवर लोकल खाली झोकुन देत आत्महत्या केल्याची घटना घडली. भूषण मोरे असे या होमगार्डचे नाव असून तो ठाणे रेल्वे पोलीसमध्ये कार्यरत होता. (Tajya Batmya)

टिटवाळा येथील उमया गलक्सीमध्ये राहणारा भूषण मोरे हा होमगार्ड म्हणून ठाणे रेल्वे पोलीस (Railway Police) मध्ये कार्यरत होता. भूषण राहत असलेल्या इमारतीमध्ये भूषणचे पार्किंग वरून चार जणांसोबत वाद झाले होते. याच वादातून भूषणने काही दिवसांपूर्वी आपली दुचाकी पेटवून दिली. बाईक शेजारील गाडीचे देखील यामध्ये नुकसान झाले होते. या प्रकरणी टिटवाळा पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या वादामुळे भूषण मानसिक तणावात होता. दरम्यान २९ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर लोकल समोर उडी मारत भूषणने आत्महत्या केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आत्महत्येपूर्वी लिहली सुसाईड नोट  

घटनेची माहिती मिळताच (Kalyan) कल्याण रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहचले. भूषणच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळली असून या सुसाईड नोटमध्ये भूषण इमारतीमधील चार जणांनी मानसिक त्रास दिल्याने आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. भूषणच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; नवीन मंत्र्यांना खातेवाटप मिळताच राजकारण तापलं

DC vs RR: दिल्लीच्या विजयानं प्लेऑफमधील चुरस वाढली; स्टार्क आणि राहुल ठरले विजयाचे शिल्पकार

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT