Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: जळगाव कोर्टातील थरारनाट्यातील फरार साथीदार ताब्‍यात; कल्याणमध्ये पिस्तूलसह मंगला एक्सप्रेसमध्ये अटक

जळगाव कोर्टातील थरारनाट्यातील फरार साथीदार ताब्‍यात; कल्याणमध्ये पिस्तूलसह मंगला एक्सप्रेसमध्ये अटक

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : जळगावमध्‍ये एका हत्येच्या प्रकरणात धम्मप्रिय सुरडकर हा तरुण जेलमधून सुटून बाहेर आला. धम्मप्रियची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बापासमोरच मुलाला मारले होते. मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला मारण्यासाठी बाप साथीदारासह थेट (Jalgaon News) जळगाव कोर्टात गेला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मनोहर सुरडकर पकडला गेला. मात्र मनोहर याचा साथीदार सुरेश हिंदाटे हा पसार झाला. त्याला (Kalyan News) कल्याणच्या आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी पिस्तूलसह मंगला एक्सप्रेसमधून अटक केली. त्याच्याजवळून पोलिसांनी एक पिस्टल व चार काडतूस हस्तगत केले आहेत. (Breaking Marathi News)

दोन वर्षापूर्वी एका हत्येच्या प्रकरणात धम्मप्रिय सुरडकर जेलमध्ये गेला होता. जेलमधून तो जामिनावर सुटून आला. ज्या तरुणाची धम्मप्रियची हत्या केली होती. त्याच्या साथीदाराने गोळ्य़ा घालून धम्मप्रिय सुरडकर याची हत्या केली. आरोपींना जळगाव कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच धम्मप्रियचे वडिल मनोहर सुरडकर यांनी साथीदारासह आरोपींना मारून बदला घेण्यासाठी कट रचला. मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जळगाव कोर्टात गेले. त्याच्यासोबत सुरेश हिंदाटे हा तरुण सुद्धा होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मनोहर याला ताब्यात घेण्यात आला. सुरेश हिंदाटे हा पसार झाला होता. अखेर हिंदाटे याला मंगला एक्सप्रेस मधून कल्याण जीआरपी व आरपीएफ ताब्यात घेतले.

रेल्‍वेत तपासणी करताना अडकला

कल्याण आरपीएफ स्कॉड आज पहाटे कल्याण स्टेशनला ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांची बँगची तपासणी करीत होते. त्याच वेळी मंगला एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली. या गाडीच्या एका बोगीत तपासणी करीत असताना एका तरुणाच्या बॅगेत पिस्तूल आणि चार जिवंत कारतूस सापडली. स्कॉडचे प्रमुख अनिल उपाध्याय आणि अन्य आरपीएफ जवानांनी या तरुणाला पुढील प्रक्रियेसाठी कल्याण जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले.

जीआरपी पोलिसांनी तपास सुरु केला. तरुणाचे नाव सुरेश हिंदाटे असून तो जळगावचा राहणार आहे. जळगाव कोर्टात खूनाचा बदला घेण्यासाठी आरोपीला मारण्याकरीता गेला असता त्याचा साथीदार मनोहर सुरडकर हा पकडला गेला. त्या ठिकाणाहून सुरेश पसार झाला होता. त्याने जळगाव स्थानकातून मंगला एक्सप्रेस पकडली आणि कल्याण गाठले असल्‍याची माहिती समोर आली. त्याच वेळी तपासणी सुरु असल्याने तो कल्याण स्थानकात पोलिसांच्या जाळ्य़ात सापडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

सुक्या भाजीत मीठ जास्त झालंय? या ट्रिकने स्वाद होईल एका मिनिटात ठीक

कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर, चुटकी वाजवून महिला, पुरुषांवर उपचार

Maharashtra Politics: काका-पुतण्याची दिलजमाई? भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी एकत्र?

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शिवसेनाविरुद्ध भाजप वाद शिगेला

SCROLL FOR NEXT