Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : फ्लिपकार्ट हबमधून लाखोंचा माल चोरी; कल्याण क्राईम ब्रँचने चौघांना घेतले ताब्यात

Kalyan News : कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात फ्लिपकार्डचे हब अर्थात ऑनलाईन ऑर्डर मिळाल्यानंतर याठिकाणाहून मालाची ऑर्डर पुरवठा करण्यात येत असतो. येथेच चोरट्यांनी हात साफ करत साहित्याची चोरी केली

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी असलेल्या फ्लिपकार्डच्या हबमध्ये चोरट्यांनी हात साफ केला आहे. यात लाखो रुपयांचा माल चोरुन नेल्याचे कल्याण कोळसेवाडी परिसरातील फ्लिपकार्ट हबमध्ये झाले आहे. या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचत चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. 

कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात फ्लिपकार्डचे हब अर्थात ऑनलाईन ऑर्डर मिळाल्यानंतर याठिकाणाहून मालाची ऑर्डर पुरवठा करण्यात येत असतो. या ठिकाणी सर्वच प्रकारचे साहित्य ठेवण्यात आलेले आहे. येथेच चोरट्यांनी हात साफ केला आहे. यात संधी साधत मोबाईल, लॅपटॉप आणि लाखो रुपये किंमतीच्या इतर महागड्या वस्तूंची चोरी केल्या होत्या. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

६ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

दरम्यान कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने तपास करत चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात प्रणव पांचाळ, प्रशांत शेलार, अमित राणे आणि अजित राणे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेला ६ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांची आणखी चौकशी सुरु आहे. 

साहित्य विक्रीच्या होते प्रयत्नात 

चोरी केल्यानंतर चौघे संशयित हे चोरी केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर वस्तू विकण्याच्या प्रयत्नात होते. मात्र क्राईम ब्रँचच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली असता कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने सापळा रचून या चारही चोरट्याना बेड्या ठोकल्या आहेत. आता ताब्यात घेतलेल्या चोरटयांनी आणखी कोठे चोरी केल्या आहेत का? याचा पुढील तपास कोळशेवाडी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई, पुणे अन् हैदराबादचा प्रवास होणार फक्त दीड तासांत; बुलेट ट्रेननं नाशिकच्या वाइन, कृषी उद्योगाला मिळेल चालना

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट

Deool Band 2 Collection : स्वामींची भक्ती अपरंपार! वीकेंडला 'देऊळ बंद 2' हाऊसफुल, बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; छप्परफाड कमाईचा आकडा किती?

PM Kisan Yojana: मे महिना संपला तरी 23 वा हप्ता नाही; शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 कधी येणार? तारीख कधी येणार समोर?

Solapur : क्रिकेटच्या मैदानात भयंकर घडलं, रोलर ओढत असताना १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT