Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : टेकडीवर राहणाऱ्या कुटुंबांना स्थलांतरासाठी नोटीस; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी सतर्क

Kalyan News : डोंगर परिसराच्या पायथ्याशी वाडा, वस्ती असते. मात्र पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते, यामुळे डोंगर पायथ्याशी असलेली घरे दबली जाऊन दुर्घटना होण्याची शक्यता असते

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरड कोसळून दुर्घटना घडू नये; यासाठी केडीएमसीने टेकडीवरील नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा पाठवल्या आहेत. १४० मधील काही कुटुंबानी स्थलांतर केलं असून काही जणांची याच परिसरात असलेल्या शाळा, हॉल संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची राहण्याची जेवण्याची सोय महापालिकेतर्फे करण्यात आल्याचे केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी सांगितले. 

डोंगर परिसराच्या पायथ्याशी वाडा, वस्ती असते. मात्र पावसाळ्यात अधिक पाऊस (Rain) झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते, यामुळे डोंगर पायथ्याशी असलेली घरे दबली जाऊन दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यानुसार कल्याण (Kalyan) शहरातील वालधुनी, नेतीवली आणि कचोरे टेकडीवरील दरड कोसळण्याच्या घटना दरवर्षी पावसाळ्यात घडतात. या दुर्घटनेत नागरिक जखमी होतात. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या टेकडीवर दुर्घटना घडण्याची भीती यंदाही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पावसाळ्यात नेतिवली, कचोरे टेकडीवरील १४० रहिवाशांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. 

केडीएमसीने नोटीस बजावलेल्या या १४० मधील काही कुटुंबांनी स्थलांतर केलं असून स्थलांतरीत कुटुंबासाठी याच परिसरात असलेल्या महापालिकेच्या संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्यात आल्याचे केडीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये; यासाठी नागरिकांनी स्थलांतर करावे त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल असं आवाहन महापालिकेने केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

kitchen Tricks: भाजीला कट आणि गडद रंग हवा? मग हे खास स्वयंपाकघराचे ट्रिक्स वापरा

Head neck cancer signs: डोकं-मानेचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 5 मोठे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

Bollywood: प्रसिद्ध गायक अन् नेत्यावर भररस्त्यावर गोळीबार; चारचाकीवरून काढला पळ, नेमकं काय घडलं?

Aadesh Bandekar: आदेश बांदेकरांचं शिक्षण किती झालय? जाणून घ्या लाडक्या भावोजींचा प्रवास

SCROLL FOR NEXT