Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : रस्त्यावर गाडी लावल्याने फेरीवाल्याकडून वाहन चालकाला दमदाटी; कल्याण स्टेशन परिसरातील प्रकार

Kalyan News : कल्याण स्टेशन परिसरातील फुटपाथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्याचे पाहायला मिळत होतं. केडीएमसीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या डोळेझाक पणामुळे आता या फेरीवाल्यांचे मुजोरी इतकी वाढली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची दादागिरी पुन्हा एकदा पाहण्यास मिळाली आहे. या ठिकाणी रस्त्यावर गाडी लावल्याने फेरीवाल्यांकडून वाहन चालकाला शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. 

कल्याण (Kalyan) स्टेशन परिसरातील फुटपाथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्याचे पाहायला मिळत होतं. केडीएमसीच्या (KDMC) संबंधित अधिकाऱ्यांच्या डोळेझाक पणामुळे आता या फेरीवाल्यांचे मुजोरी इतकी वाढली की फेरीवाल्यांनी फुटपाथसह रस्त्यांवर देखील अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर गाड्या लावणाऱ्या वाहन चालकांना देखील फेरीवाल्यांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. 

आज देखील एका वाहन चालकाने काही वेळाकरीता गाडी रस्त्याच्याकडेला उभे केली असता फेरीवाल्यांनी इथं आम्हाला सामान ठेवायचे आहे. ही गाडी इथून पुढे घ्या असे सांगत वाहन चालकासोबत हुज्जत घालत शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. फेरीवाल्यांची ही दादागिरी मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. (Kalyan Railway Station) या घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून अशा मुजोर फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर जोरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : डोकं शांत ठेवा! या 6 राशींना मिळणार मानसिक शांतता, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJP Protest: ज्ञानू मस्ट गो! दिपकेंचा इशारा; CJPचं मुंबईत जेल भरो आंदोलन

Tuesday Horoscope: नोकरीत नवीन जबाबदारी अन् आर्थिक लाभ; ‘या’ 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार फायदेशीर

ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; काँग्रेससह विरोधक रस्त्यावर

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

SCROLL FOR NEXT