KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News : महिनाभरापासून दूषित पाणीपुरवठा; केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष

Kalyan News : कल्याणच्या चिकणघर परिसरात असलेल्या नव एव्हरेस्ट सोसायटीमध्ये एकूण ७५ सदनिका आहेत. सोसायटीमध्ये महिनाभरापासून या सोसायटीला दूषित पाणी पुरवठा होत आहे. सोसायटीत पिवळ्या रंगाचे गढूळ पाणी

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणच्या चिकणघर परिसररातील नव एव्हरेस्ट सोसायटीमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. साधारण महिनाभरापासून सोसायटीत हि समस्या असून केडीएमसी प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे भाजपकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

कल्याणच्या चिकणघर परिसरात असलेल्या नव एव्हरेस्ट सोसायटीमध्ये एकूण ७५ सदनिका आहेत. या सोसायटीमध्ये गेल्या महिनाभरापासून या सोसायटीला दूषित पाणी पुरवठा होत आहे. सोसायटीत पिवळ्या रंगाचे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांनी याबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र केडीएमसी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 

दूषित पाण्याने नागरिक पडताय आजारी 

केडीएमसीने पंधरा दिवसांपूर्वी पाण्याचे नमुने घेतले. मात्र त्याबाबतचा अहवाल अद्याप आला नसल्याचे सांगितले. या दूषित पाणीपुरवठामुळे या इमारतीमधील रहिवाशांना, लहान मुलांना, वृद्ध नागरिकांना उलट्या, टायफाईड, ताप, डायरिया या सारखे आजार झाले आहेत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा नागरिक याबाबत केडीएमसीकडे तक्रार करूनही दुर्लक्ष करत असल्याने दाद कुणाकडे मागायची असा सवाल नागरिक करत आहेत. 

भाजपकडून आंदोलनाचा इशारा 

केडीएमसीकडे तक्रार करून देखील दूषित पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान याबाबत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी केडीएमसीने दूषित पाणीपुरवठाची समस्या येत्या दोन दिवसात सोडवले नाही; तर भाजपतर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा केडीएमसीला दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death News : सैराट फेम अभिनेत्याला पितृशोक! वडिलांचं निधन, ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Nagpur News: क्रिकेट टीममध्ये निवड झाली नाही, १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचललं टोकाचं पाऊल, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

Breaking : भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहींचा शोध सुरू

Ladki bahin Yojana : ऑगस्ट उजाडणार पण जुलैचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींच्या १५०० रुपयांबाबत अपडेट समोर

SCROLL FOR NEXT