Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Congress : कल्याण वासियांसाठी काँग्रेसची अनोखी स्पर्धा; बिनखड्ड्याचा रस्ता शोधणाऱ्यास ५ हजाराचे बक्षिस

Kalyan News : कल्याण- डोंबिवली मधील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. याचा होणार त्रास लक्षात घेता काँग्रेस महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून केडीएमसीवर निशाणा साधला आहे

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे 

कल्याण : कल्याण डोंबिवलीत जवळपास सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. पाऊस सुरु असल्याने या खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचलेले असून वाहनधारकांची रस्त्यावरून गाडी चालविताना मोठी कसरत होत आहे. याच अनुषंगाने काँग्रेसकडून कल्याण मधील नागरिकांसाठी अनोखी स्पर्धा आणली असून बिन खड्ड्यांचा रस्ता शोधून दाखविणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

कल्याण- डोंबिवली शहरामधील रस्त्यावरील खड्ड्यांची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी अनोखी स्पर्धा जाहीर करत बिना खड्ड्यांचा रस्ता दाखवणाऱ्याला ५ हजारांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या ढिसाळ कारभारावर टीकास्त्र सोडले आहे. 

गणेश मूर्तींची विटंबना होण्याची शक्यता 

गणेशोत्सव तोंडावर येऊनही अद्याप कल्याण- डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे परिस्थितीत आहेत. येत्या काही दिवसांत गणेशोत्सव हा लोकांच्या भावनांशी जडलेला सण सुरू होत आहे. या परिस्थितीत खड्ड्यांमधून श्री गणरायाचे आगमन झाले, तर श्री गणेशमूर्तीची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असे झाले तर गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या जातील; अशी भावना काँग्रेस जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

पालिकेच्या आवारातच घेणार स्पर्धा 
येत्या तीन- चार दिवसात संपूर्ण कल्याण शहरातील छोटे- मोठे आणि मुख्य रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणीही कुलकर्णी यांनी केडीएमसी आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसे न झाल्यास कल्याण- डोंबिवली महिला काँग्रेसच्यावतीने ५०० मीटरचा विना खड्ड्याचा रस्ता दाखवा आणि रोख ५ हजार रुपयांचे बक्षीस मिळवा; अशा प्रकारची स्पर्धा पालिकेच्या आवारात घेण्यात येईल आणि याचे जे ही परिणाम होतील; त्याकरिता तुम्ही स्वतः जबाबदार असाल असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT