kalyan railway station Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: बेरोजगारीमुळे कर्जबाजारी; यातून घडले चुकीचे कृत्‍य, रेल्वे पोलिसांच्‍या ताब्‍यात

बेरोजगारीमुळे कर्जबाजारी; यातून घडले चुकीचे कृत्‍य, रेल्वे पोलिसांच्‍या ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात महिलेची चैन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी रंगेहाथ (Kalyan) अटक केली आहे. रोशन पाटील असे या चोरट्याचे नाव आहे. रोशन हा बेरोजगार होता. काम मिळत नसल्याने तो कर्जबाजारी झाला यातूनच त्याने चोरीचा मार्ग निवडल्याचे पोलीस (Police) तपासात निष्पन्न झाले आहे. (Latest Marathi News)

कल्याण रेल्वे स्थानकात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक महिला कुटुंबासह कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Railway Station) प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील मिडल ब्रिजवरून उतरत होती. याच दरम्यान एका चोरट्याने महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरड करताच कर्तव्यावर तैनात असलेल्या कल्याण रेल्वे पोलीस व आरपीएफ जवानाचे लक्ष गेले. त्यांनी पाठलाग करत या चोरट्याला पकडले. रोशन पाटील असे या चोरट्याचे नाव असून तो भिवंडी येथील राहणार आहे.

रोशन अनेक वर्ष नोकरीच्या शोधात होता. मात्र काम न मिळाल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्याच विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग निवडला. मात्र पहिल्यांदाच चोरी केली व तो कल्याण रेल्वे पोलिसांच्या (Railway Police) तावडीत सापडला. कल्याण रेल्वे पोलिसांनी रोशन पाटील विरोधात गुन्हा दाखल करत त्याच्याकडून दीड लाख रुपये किंमतीचे चोरलेली चैन हस्तगत केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : ६ राशींची होणार चांदी; कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Saree Colour Tips: साडीत दिसाल एकदम स्लिम अन् गॉर्जियस! बॉलिवूड अभिनेत्री फॉलो करतात हा सिक्रेट कलर फॉर्म्युला

8th Pay Commission : 3.83 किंवा 4.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किती वाढेल पगार? जाणून घ्या गणित

BJP Leader: भाजप नेत्याच्या ताफ्यावर हल्ला, दगड-अंडी फेकल्याचा आरोप; राजकारणात खळबळ

Dalimb Fruit: डाळिंब आहे अत्यंत गुणकारी; शरीराला कोणते पाच फायदे मिळतात?

SCROLL FOR NEXT