dombivali crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याने तक्रारदारच्या घरावर हल्ला; डोंबिवली कोपरमधील धक्कादायक घटना

Kalyan News : डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात सुधाकर पावशे हे कुटुंबासोबत राहतात. काही महिन्यापूर्वी त्यांच्या जागेवर एका इमारतीचे काम सुरु झाले.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: अनधिकृत बांधकामाची तक्रार केली म्हणून तक्रारदारच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची घटना डोंबिवली कोपर परिसरात घडली आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पुढील तपास सुरू केला आहे. घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून घडलेल्या प्रकाराने तक्रारदार व त्याचे कुटुंब भयभीत झाले आहे. 

डोंबिवली (Dombivali) पश्चिमेतील कोपर परिसरात सुधाकर पावशे हे कुटुंबासोबत राहतात. काही महिन्यापूर्वी त्यांच्या जागेवर एका इमारतीचे काम सुरु झाले. सुधाकर पावशे यांनी या प्रकरणाची तक्रार महापालिकेकडे केली होती. महापालिकेने कारवाईचे आश्वासन दिले. मात्र कारवाई केली नाही. दरम्यान सुधाकर पावशे यांच्या तक्रारीची दखल लोकायुक्तांनी घेतली. लोक आयुक्तांनी ही अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेश दिले. मात्र महापालिकेच्या (KDMC) अधिकाऱ्यांनी निवडणूकीचे कारण देत कारवाई टाळली. पावशे यांनी पाठपुरावा केल्यावर केडीएमसीने मंगळवारी सकाळी कोपरमधील या अनधिकृत इमारतीवर कारवाई केली. 

महापालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर सुधाकर पावशे यांच्या घरासमोर काही महिला आल्या. महिलांनी आरडाओरड करत सुधाकर पावशे यांना घराबाहेर या असे सांगितले. पावशे घराबाहेर आले नाही म्हणून महिलांनी त्यांचे दार जोरजोरात ठाेठावले. तसेच त्यांची नेमप्लेट तोडली. घराच्या बाहेरच्या वस्तूंची नासधुस केली. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या महिलांच्या विरोधात विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भूमाफिया माझ्या घरावर हल्ला करतात. या भुमाफियाला शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदार सुधाकर पावशे यांनी केला. आम्ही घराबाहेर पडून शकत नाही. सरकारने या घटनेकडे लक्ष द्यावे. मुख्यमंत्र्यानी या घटनेची गंभीर दखल घ्यावी; अशी मागणी पावशे यांनी केली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT