ATM Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime: युट्युबवर व्हिडिओ पाहून एटीएम मशीनमध्ये छेडछाड; चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News : युट्युबवर व्हिडिओ पाहून एटीएम मशीनमध्ये छेडछाड; चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : एटीएममध्ये छेडछाड करण्याचा व्हिडीओ युट्युबवर पाहून चोरी करण्याचा प्रकार कल्याणमध्ये (Kalyan) समोर आला आहे. अशाच प्रकारे (ATM) एटीएम मशीनशी स्ट्रीप, पट्टी, स्क्रू ड्रायव्हर अशा विविध साहित्याने छेडछाड करत एटीएममधून पैसे काढल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यावरून चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (LIve Marathi News)

कल्याणमधील सहजानंद चौक परिसरातील एका बँकेच्या एटीएम मशीनशी छेडछाड करत दीड हजार रुपये काढल्याचे समोर आले होते. चोरी करताना एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याची ओळख पटवली. सुनील वर्मा असे या चोरट्याचं नाव असून तो रेतीबंदर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र घटनेनंतर तो उत्तर प्रदेश येथे पळून गेला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस त्याच्या मागावर होते. तो पुन्हा रेतीबंदर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत  सुनील वर्मा याला बेड्या ठोकल्या. तपासा दरम्यान युट्युबवरील व्हिडिओ पाहून (ATM Crime) एटीएम मशीनमधून कसे पैसे काढायचे हे तो शिकला.  त्याने आणखी काही ठिकाणी अशा प्रकारे चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

SCROLL FOR NEXT