Online Fraud Saam tv
महाराष्ट्र

Online Fraud : सेवानिवृत्त बँक मॅनेजरला ७२ लाखांचा गंडा; तीन जणांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kalyan News : ऑनलाईन, फोन कॉलद्वारे आर्थिक नफ्याचे आमिष दाखवून तर कधी अकाउंट बंद करण्याची भीती दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: एका वित्तीय कंपनीतील डाटा मिळवून बँकेच्या सेवानिवृत्त व्यवस्थापकाचे ७२ लाख रुपये लांबवले होते. हा प्रकार वृद्धाच्या मुलाच्या लक्षात आल्याने फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या फसवणूक करणाऱ्या तीन संशयितांकडून ७२ लाखापैकी ९ लाख रुपये हस्तगत केले आहेत. 

ऑनलाईन, फोन कॉलद्वारे आर्थिक नफ्याचे आमिष दाखवून तर कधी अकाउंट बंद करण्याची भीती दाखवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. या वाढत्या गुन्ह्यांमुळे पोलीस यंत्रना देखील चक्रावली आहे. असाच प्रकार (Dombivali) डोंबिवलीमध्ये उघडकीस आला आहे. डोंबिवली पूर्वेतील खोणी पलावा परिसरात राहणारे मुधकर पराते हे एका बँकेत डिव्हिजन मॅनेजर पदावर कामाला होते. ते सेवानिवृत्त झाले असून त्यांनी एका या वित्तीय कंपनीत गुंतवणूक केली होती. त्यांच्या गुंतवणूकीची मॅच्युरिटी समाप्त होणार होती. फेब्रुवारी महिन्यात त्यांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले, कि तुम्ही ज्या (Online Fraud) कंपनीत गुंतवणूक केली आहे. तिथे तुमच्या एजेंटने फसवले आहे. यामध्ये त्याला जास्त फायदा झाला आहे. फायद्याची रक्कम तुम्हाला मिळालेली नाही. 

हे ऐकून पराते यांना धक्का बसला. त्यांनी लगेच त्या व्यक्तीला माझे पैसे कसे काय मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर समोरच्याने पराते यांच्या मोबाईलवर तीन फॉर्म पाठविले. तुम्हाला पैसे परत हवे असल्यास त्यासाठी काही रक्कम भरावी लागेल. ही बतावणी करुन पराते यांच्याकडून फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान ७२ लाख रुपये घेतले. फोन करणाऱ्या व्यक्तीने पराते यांच्याकडे आणखीन १४ लाखाची मागणी केली. मात्र पराते यांच्याकडे पैसे नव्हते. पराते यांची दोन्ही मुले मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर असून  त्यांनी मुलांकडे पैसे मागितले. मुलांनी पैसे कशासाठी हवेत अशी विचारले असता घडला प्रकार सांगितला. हे ऐकून वडिलांची कोणी तरी फसवणूक करीत असल्याचे लक्षात आले. 

९ लाख केले परत 

या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. यांनतर पोलिसांनी बँक अकाउंट वापरण्यात आलेल्या सर्वेश कुमार आणि महेंद्र कुमार या दोन तरुणांना दिल्ली येथून अटक करण्यात आली. तर बँक आकाऊंट वापरणारा राज राजपूत याला गोव्यातील कॅसिनो मधून अटक केली. या तिघांचे आणखी काही साथीदार असल्याचा संशय पोलिसांना असून पराते यांनी ज्या कंपनित पैसे गुंतविले होते. त्या कंपनीतून पराते यांच्या गुंतवणूकीती संदर्भातील माहिती या तिघांपर्यत कशी पोहचली याचाही तपास पोलिस करीत आहेत. अटक केलेल्या तिघांकडून पोलिसांनी ९ लाख रुपये हस्तगत केले करत रक्कम पराते यांना परत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT