mobile phone taking pictures of women Rupesh Koyte  Saam Tv News
महाराष्ट्र

Kalyan Crime : रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या महिलांचे फोटो काढायचा, महिलादिनी रणरागिणींनी दिला चोप

Kalyan Khadakpada Crime News : तीन महिन्यांपासून कोयते नावाचा हा इसम रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांचे तरुणींचे फोटो काढतो. लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत तो सर्व महिला वर्गाचे फोटो काढतो.

Prashant Patil

ठाणे (कल्याण) : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. पुणे स्वारगेट बस डेपोतील तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. एवढं असताना देखी कल्याणमधील खडकपाडा येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एक युवक महिलांसह मुलींचे फोटो काढत असल्याचा आरोप करच या युवकाला चांगलं चोपलं आहे. आरडाओरड केल्यामुळे ही घटना उघडकीस आलीय.

हा युवक तिथे उभा राहून महिलांसह तरुणींकडे एकटक बघत होता आणि त्यांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढत होता. हा प्रकार लक्षात येताच तिथल्या नागरिकांनी आणि महिलांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्याचा मोबाईल चेक केला असता त्याच्या मोबाईलमध्ये अनेक महिला आणि मुलींचे फोटो असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. रुपेश कोयते असं या तरुणाचं नाव आहे. 'या विकृत तरुणाला आमच्या ताब्यात द्या', अशी मागणी करत खडकपाडा पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी एकच गोंधळ घातला. या नराधमाला ताब्यात घेत खडकपाडा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

तीन महिन्यांपासून कोयते नावाचा हा इसम रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांचे तरुणींचे फोटो काढतो. लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत तो सर्व महिला वर्गाचे फोटो काढतो. आम्ही गावातील ५० ते ६० लोकं इथे जमलो आहोत त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

SCROLL FOR NEXT