Kalyan Maharera building action SaamTV
महाराष्ट्र

गँग्स ऑफ डोंबिवली टोळीचा म्होरक्या बिंधास्त, KDMC इमारती कारवाईबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

Deepesh Mhatre KDMC Maharera Buildings Demolished : हा हजारो कोटीचा घोटाळा आहे. हा घोटाळा करणाऱ्या गँग्स ऑफ डोंबिवली टोळीचा म्होरक्या पोलीस संरक्षणात फिरतोय त्याच्यावर कठोर कारवाई करा, शिवसेना ठाकरे गटाची मागणी.

Prashant Patil

ठाणे : महारेरा घोटाळ्यामध्ये ६५ इमारतींवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे . या इमारतींवर कारवाई होऊ देणार नाही, असं सांगत ठाकरे गट रस्त्यावर उतरलाय. दुसरीकडे आज ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

कागदपत्राच्या आधारे हजार कोटींचा घोटाळा झालाय. घोटाळा करणारे मोकाट असून यामध्ये रहिवासी भरडले जातायत. शासनाचे हजारो कोटींचे उत्पन्न बुडाले, दोन हजार कोटींचे बँकेचे लोन आणि १०० कोटी रुपये पंतप्रधान आवास योजनेचे लाटले गेले. खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या गँग्स ऑफ डोंबिवली टोळीचा म्होरक्या पोलीस संरक्षणात फिरतोय ही दुर्दैवी आहे. सर्वात आधी अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

आज ६५ बेकायदा इमारतीमधील नागरीकांसह ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांची भेट घेतली. केडीएमसी आयुक्तांच्या बैठकीत नागरीकांना दिलासा कसा मिळेल, यावर चर्चा करण्यात आली. यानंतर म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गौप्यस्फोटामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या घोटाळ्याचा मूख्य सूत्रधार आणि खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या ज्याच्यावर याआधी देखील कागदपत्र बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र तो पोलीस संरक्षणात फिरतोय. त्याला राजकीय वरदहस्त आहे. त्याच्या विरोधात कारवाई कधी करणार असा सवाल म्हात्रे यांनी केला.

या रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या या गँग्स ऑफ डोंबिवलीकरवर कठोर गुन्हे दाखल करा, अशी मागणी देखील म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्त तसेच पोलिस आयुक्तांकडे केली आहे. दीपेश म्हात्रे यांनी आरोप केलेल्या इसमाचे नाव सुजित नलावडे असून तो सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याची माहिती आहे. दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

SCROLL FOR NEXT