Kalyan crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan crime : चोरलेली बाइक पाहायला आले अन् जाळ्यात अडकले, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अट्टल चोरांना घडली जन्माची अद्दल

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर आलेल्या दोघा जणांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशी दरम्यान हे दोघे सराईत चोरटे असल्याचे समोर आले. चोरी करुन ठेवण्यात आलेली दुचाकी जागेवर आहे की नाही, हे पाहण्यासाठी चोरटे आले आणि पोलिसांच्या ताब्यात सापडले आहे. 

वाहिद खान आणि राहूल परिहार अशी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत. दोघांनी मिळून आत्तापर्यत तीन दुचाकी आणि दोन रिक्षा चाेरी केल्या आहे. दरम्यान (Kalyan) कल्याण कृषी उत्पन्न बाजार नेहमी गर्दी असते. फळ आणि भाजीपाल्याच्या गाड्या लागलेल्या असतात. या गर्दीचा फायदा घेत एका दुचाकीवर दोन तरुण फिरत असल्याचे काही लोकांना दिसले. या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. नंबर प्लेट नसलेली दुचाकी फिरत असल्याने त्याठिकाणच्या लोकांना संशय आला. याची माहिती बाजारपेठ पोलिसांना दिली. 

बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश सिंग गौड यांनी या तरुणांची चौकशी करण्याकरीता पोलिस अधिकारी अजिंक्य मोरे आणि काही पोलिसाना पाठविले. पोलिसांनी या दोन तरुणाना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघे तरुण घेऊन आलेली दुचाकी चाेरीची होती. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता दोघे सराईत चोर असल्याची माहिती समोर आली. तर चोरी केलेली  दुचाकी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभी करुन ठेवली होती. त्याच ठिकाणी ती दुचाकी आहे की नाही हे पाहण्यासाठी ते आले होते. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या तीन दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त केल्या आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Shinde Encounter: आम्ही साडेचार वाजता अक्षयची भेट घेतली तेव्हा…; चकमकीच्या घटनेवर अक्षयच्या काकांचा धक्कादायक खुलासा

Maharashtra News Live Updates: राज्यातील काही जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता

Akshay Shinde Encounter: अक्षयने एपीआय निलेश मोरेंवर केला गोळीबार, मुख्यमंत्री शिंदेंनी दिली घटनेची संपूर्ण माहिती; वाचा...

Akshay Shinde Encounter: स्वसंरक्षण की हत्या? अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधकांचा सरकारला सवाल

Akshay Shinde Encounter: बदलापूर प्रकरपणातील आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण? वाचा

SCROLL FOR NEXT