Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News: मारहाण करुन नागरीकांची लूट; दोन नशेखोर चोरट्याना सीसीटीव्हीच्या आधारे अटक

Kalyan News : दोेघांनी कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाईक चोरी केली होती

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : नागरीकाला मारहाण करुन त्याची चैन आणि पैसे लुटणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याणच्या (Kalyan) बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Crime News) यांच्याकडून चोरी केलेली चैन, रोकड आणि तीन बाईक हस्तगत करण्यात आली आहे. हे दोघेही नशेखोर असून नशेकरीता ते चोरी करीत होते. (Tajya Batmya)

निहाल शेख आणि चांद शेख अशी या चाेरट्यांची नावे आहे. हे दोघे ५ नाेव्हेंबरच्या दिवशी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नागरीकाला मारहाण करुन त्याच्याकडून चैन आणि त्याची दहा हजार असलेली पर्स लुबाडून बाईकस्वार तरुण पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद होती. सीसीटीव्हीत दिसणारे चोरटे आणि गाडी नंबरच्या सहाय्याने कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी शोध सुरु केला. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक अशोक कडलक, प्रभारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पवार यांच्या मार्दशनाखाली पोलिस अधिकारी अजिंक्य मोरे तपास करीत होते. या प्रकरणात प्रभारी  यांनी देखील महत्वाची भूमीका बजावली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीसीटीव्हीचे फुटेज काढून अखेर या प्रकरणात पाेलिसांनी निहाल शेख आणि चांद शेख यांना ताब्यात घेतले. दोघांकडून पोलिसांनी चोरीस गेलेले दागीने आणि रोकड हस्तगत केली आहे. या दोेघांनी कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाईक चोरी केली होती. त्या बाईक देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे. निहाल हा रिक्षा चालक आहे. तर चांद हा बेरोजगार आहे. दोघांना नशा करण्याची सवय आहे. नशा करण्यासाठी पैसे नसल्याने या दोघांनी चौरीचा मार्ग पत्करला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

भारतीय औषधांवर 100% टॅरिफ; ट्रम्प यांनी खुपसला भारताच्या पाठीत खंजीर

सरकारी कर्मचारी होणार मालामाल; पगारात भरघोस वाढ कधीपासून होणार?

ट्रम्पचा फुगा अमेरिकेनंच फोडला; इराण बलशाली अमेरिकी अधिकाऱ्यांचीच कबुली

Shocking: धावती ट्रेन पकडताना हात सुटला, ५ सेकंद प्लॅटफॉर्म अन् ट्रेनच्या मधोमध फरफटत गेला तरुण; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT