Kalyan Crime Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime : नकली पिस्तूल दाखवत केली पैशांची मागणी; पोलीसात तक्रार केल्याने घरावर दगडफेक, कल्याणमधील धक्कादायक घटना

Kalyan News : कारखान्यात सुभान पठाण नावाचा तरुण येऊन पैशांची मागणी करत होता. रविवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास नकली पिस्तुल दाखवत धमकाविले. दोघांनी मिळून एक हजार रुपयांची मागणी केली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याणमध्ये गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. यातच दुकानात नकली पिस्तुलने धमकावत पैशांची मागणी केली. या प्रकरणी दुकानदाराने पोलिसात तक्रार दिली. याचा राग मनात धरून या धमकवणाऱ्या तरुणाने पुन्हा तक्रारदाराच्या घरावर दगडफेक केली. तसेच गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. 

कल्याण पूर्वेकडील काटेमानेवली परिसरात मोहम्मद शब्बीर शेख हे भाऊ व वहिनीसह प्रभात चाळ येथे हँडवर्कचा छोटासा कारखाना चालवतात. याच कारखान्यात सुभान पठाण नावाचा तरुण येऊन वारंवार पैशांची मागणी करत होता. दरम्यान रविवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास नकली पिस्तुल दाखवत धमकाविले. तर थोड्याच वेळात सुभान पठाण आपल्या साथीदार सिद्धार्थ अहिरेसोबत परत आला आणि दोघांनी मिळून पुन्हा एक हजार रुपयांची मागणी केली. 

पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात 

यावेळी शब्बीर शेख यांनी प्रसंगावधान राखत दोघांना कारखान्यातच अडवून ठेवलं आणि पोलिस कंट्रोल रूमला फोन करत घडलेल्या प्रकारची माहिती दिली. कोळसेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात दोघांना ताब्यात घेतलं. पोलिस तपासात त्यांच्या जवळील पिस्तुल बनावट असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र काही तासांतच पोलिसांनी नोटीस देऊन दोघांना सोडून दिलं.

तक्रार केल्याच्या रागातून घरावर दगडफेक 

पोलिसांनी सोडल्यानंतर दोघेजण तक्रारदाराच्या घराजवळ अन्य साथीदारांसह परत आले. याठिकाणी गुन्हा मागे घेण्याचा दबाव टाकू लागले. तक्रार मागे घेतली नाही, यामुळे त्यांच्या घरावर दगडफेक करत तक्रारदाराच्या घराचे आणि गाडीचे नुकसान करत तिथून पळ काढला. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली असून पोलिसांकडून कारवाई नाही आणि गुन्हेगार मोकाट फिरतात. मग आम्ही करायचं तरी काय? असा सवाल पीडित कुटुंब करत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT