Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News : एकाच रात्रीत चार दुकानासह एका घरात चोरी; चोरट्यांनी लांबविला लाखोचा मुद्देमाल

Kalyan News : कल्याण पूर्वेतील गणेशवाडी, मच्छिमार्केट परिसरात अज्ञात चोरट्यानी बार सहीत काही दुकानांचे शटर तोडून मुद्देमाल आणि रोख रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: शहरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. बंद घर पाहून चोरटे संधी साधत चोरी करून पसार होत आहेत. अशीच घटना कल्याणमध्ये घडली असून चोरट्यानी एकाच रात्री चार दुकानांसह एक घर व एका बारमध्ये चोरी केल्याचे समोर आले आहे. या ठिकाणाहून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

कल्याण (Kalyan) पूर्वेतील गणेशवाडी, मच्छिमार्केट परिसरात अज्ञात चोरट्यानी बार सहीत काही दुकानांचे शटर तोडून मुद्देमाल आणि रोख रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. बुधवारच्या मध्यरात्री २ ते ३ बाजेच्या सुमारास गणेश वाडीतील अमृत पॅलेस बार, अन्नपूर्णा मालवणी स्टोअर्स, पाणेरी कपड्याचे दुकान, केअर ॲड कॅअर, मेडीकल स्टोअर्स या दुकानांसह देवी दयाल टॉवर जवळील एक घरात घरफोडी केली आहे. एका मागून एक चोरी (Theft) करत चोरटे पसार झाले आहेत. 

चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद 

चार दुकान व एका घरात चोरी करून चोरट्यांनी एक लाखाहून अधिकची रोकड व मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. चोरीची ही (Crime News) घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या बाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. दरम्यान एकाच रात्रीत झालेल्या या घररफोडीच्या घटनांमुळे कोळशेवाडी पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील रहिवासी व व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT