Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News: अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देत अत्याचार

अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देत अत्याचार

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमूख

कल्याण : अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये (Kalyan) उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी (Police) या रितेश दुसाने या नराधमाला अटक केली आहे. (Maharashtra News)

कल्याण पूर्व परिसरात वास्‍तव्‍यास असलेला पीडित अल्पवयीन मुलगा काल दुपारच्या सुमारास मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेला होता. पीडित मुलगा घरी येण्यासाठी रिक्षात बसला. तो रिक्षाने घरी आला, मात्र घराला कुलूप असल्याने त्याला रिक्षाला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तो पुन्हा रिक्षा घेऊन त्याच ठिकाणी आला. रिक्षा चालकासोबत या पीडित मुलाचे बोलणे सुरू असताना रितेश दुचाकीवर त्याच ठिकाणी उभा होता. या नरधामाची नजर या मुलावर पडली.

दुचाकीवर बसवून नेले लॉजवर

रितेशने रिक्षा चालकाला रिक्षाचे पैसे देऊ केले. त्यानंतर पीडित मुलाशी ओळख वाढवली आणि मुलाला घरी सोडतो असे सांगून दुचाकीवर बसवून कल्याण पूर्व येथील एका लॉजवर घेऊन गेला. त्या ठिकाणी पीडित मुलाला कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध पाजत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी रितेश दुसाने या नराधमाला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

SCROLL FOR NEXT