Kalyan Crime News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Crime News : सधन घरातील दोघी बहिणी बनल्या चोर; हौस मौजसाठी करायचे असे कृत्य

Kalyan News सधन घरातील दोघी बहिणी बनल्या चोर; हौस मौजसाठी करायचे असे कृत्य

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: ज्वेलर्स दुकानात खरेदीच्या बहन्याने जाऊन दुकानदाराला बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन बहिणींना महात्मा फुले पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्यात. निशा पुणवानी, रेश्मा पुनवाणी अशी या दोन्ही बहिणींची नावे आहेत. त्या उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या आहेत. या दोन्ही (Kalyan) बहिणी सधन घरातील असून हौस मौज करण्याचा खर्च भागवण्यासाठी या दोघींनी चोरीचा मार्ग पत्करला. (Live Marathi News)

कल्याण पश्चिम नारायणवाडी परिसरातील शंकलेशा ज्वेलर्समध्ये दोन दिवसापूर्वी दोन अज्ञात महिला आल्या. दागिने खरेदी करण्याच्या बहन्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलन्यात गुंतवले व दुकानातील सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्या. या घटनेमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. या दोन्ही महिला दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या होत्या. 

सीसीटीव्हीच्या आधारे शोध 

महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, सुचित टिकेकर यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे या दोन्ही महिलांचा शोध सुरू केला. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी निशा पुनवाणी, रेश्मा पुनवाणी या दोन्ही बहिणींना उल्हासनगर येथून बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT