Kalicharan Maharaj On Jitendra Awhad Saam TV
महाराष्ट्र

Kalicharan Maharaj On Jitendra Awhad: मी तुकडा टाकल्यावर राजकीय कुत्रे भू भू करतात, कालीचरण महाराजांची टोकाची टीका

Kalicharan Maharaj News: कालीचरण महाराज यांनी आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambahjinagar News : कालीचरण महाराज नेहमीच राजकीय भाष्य करत असतात आणि त्यामुळे अनेकदा वादही निर्माण होतात. कालीचरण महाराज यांनी आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी तुकडा टाकल्यावर राजकीय कुत्रे भू भू करतात. त्याचे मी टेन्शन घेतच नाही. धर्माचे कार्य करत राहीन, घाबरणार नाही, असं म्हणत कालीचरण महाराज यांनी जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

माझ्या तुकड्याची राजकीय कुत्रे वाटच पाहत राहतात, पण मी कुणी निंदा, कुणी वंदा, काली कीर्तन हाच माझा धंदा, असंही त्यांनी म्हटलं. (Latest News Update)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घोसला गावात ते आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे काम आम्हाला करायचे आहे. धर्मासाठी व देशासाठी काम करताना आम्ही कोणत्याही स्तरावर जायला तयार असल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला. (Political News)

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

नथुराम गोडसेने महात्मा गांधींबाबत जे केले ते बिल्कूल योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता. नथुराम गोडसे यांना कोटी कोटी प्रणाम आहे. जितके नथुराम गोडसेंना वाचाल तेवढे तुम्ही त्यांचे भक्त व्हाल, असं गंभीर स्वरुपाचं वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलं होतं.

यावर जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजांवर सडकून टीका केली. कालीचारणची लायकी काय, त्याचे शिक्षण आहे काय? देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे आहे. महात्मा गांधी बद्दल बोलणारा कालीचरण कोण? असा सवाल आव्हाडांनी विचारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT